सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होऊन,निस्वार्थ सेवा करणारे खा. सुधाकरराव श्रृगांरे हे जनतेच्या मनातील उमेदवार- गोविंद गिरी

महावार्ता न्यूज अहमदपूर/ प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांत खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांनी सर्वसामान्य जनतेत समरस होऊन निस्वार्थपणे सर्व धर्मीय जनतेची सेवा केल्यामुळे या निवडणुकीत खा. सुधाकरराव श्रृगांरे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी केले आहे.
खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी लातूर जिल्ह्यात हरघर नल योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणुन महीलाच्या डोक्या खांद्यावरील घागर उतरण्याचे कार्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून लातूर येथील महत्वकांक्षी असलेला पीट लाईटचा विषय मार्गी लावून रस्त्याचे जाळे निर्माण केले आहेत.
खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी गेल्या पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णा भाऊ साठे अशा अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव स्वखर्चाने करून जनसामान्याचे मने जिंकली आहेत.
पाचशे वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या श्रीरामाच्या मंदिराचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मार्गी लावून देशातील राम भक्ताचा आनंद द्विगुणित केला.22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने अहमदपूर येथे आकर्षक असा श्रीरामाचा तिन दिवस दरबार भरवल्याणे लाखो लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते. तसेच लातूर जिल्हाभर तालुका स्तरावर बौद्ध धम्म परिषदा घेऊन सर्वधर्म समभाव जपण्याचेही कार्य करुण, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, प्रादेशिक पर्यटन विभागाने मार्फत जिल्हातील अनेक तीर्थ क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला.
गेल्या पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात विनामोबदला वितरित केला असून खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी आजपर्यंत एक रुपयांची टक्केवारी घेतली नाही किंवा कुठलाच एक रुपयांच्या हप्त्याला स्पर्ष केला नसल्याने खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना स्वच्छ प्रतिमेचा, निस्वार्थी, निष्कलंक, चारीत्रसंपन्न उमेदवार म्हणून ओळखले जात आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे व जनतेच्या मनातील लोकप्रिय उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी केले आहे.