ताज्या घडामोडीमनोरंजन
स्वामी विवेकानंद चा बालाजी चेपूरे झाला शिष्यवृत्तीसाठी पात्र.

- महावार्ता न्यूज: चाकूर तालुक्यातील चापोली स्वामी विवेकानंद विद्यालय चा बालाजी दत्ता चेपुरे इयत्ता आठवी चा विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरला आहे.लातूर जिल्ह्यात 17वा क्रमांक प्राप्त करीत विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.सदरील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थास दरमहा एक हजार रुपये प्रमाणे चार वर्षेचे एकूण 48000/रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशवंत विद्यार्थांचा सत्कार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्याध्यापक व संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला..यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन रामगीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, मुख्याध्यापक व संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे, संचालक बालाजी सूर्यवंशी,चंदर अण्णा तेलंगे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव होनराव शिष्यवृत्ती परीक्षा प्रमुख विठ्ठल गवळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.