जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाकूरात वटपौर्णिमा साजरी.
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

- चाकूर : (महावार्ता न्यूज) प्रशासनामार्फत वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वटपौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने किमान दहा झाडे लावावीत असे आवाहन जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर घुगे यांनी केले होते. या अनुषंगाने पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी प्रतिसाद देत वृक्षारोपण करण्यात आले.
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त हिंदू धर्मातील सुवासिनी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत पांढरा धागा गुंडाळतात. सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून ईश्वराला प्रार्थना करतात अशी समजूत आहे. मात्र आज वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील साखरा येथे विलासराव देशमुख वन उद्यानात वन विभागामार्फत 50 रोपे लावून या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
यास प्रतिसादात देत चाकूर पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, गटशिक्षणाधिकारी मंडोदरी वाकडे- निकम, नायब तहसीलदार शैलेश निकम, विस्तार अधिकारी अशोक पांचाळ, मुख्याध्यापक राजकुमार गड्डीमे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद कन्या प्रशाला चाकूर या ठिकाणी सकाळी वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी गटसाधन केंद्र चाकुर येथील कर्मचारी अभिमन्यू थोरात,धनराज सूर्यवंशी, हरिश्चंद्र पवार, रोहण कुळकर्णी, नगरपंचायत चे अशोक स्वामी, योगिता पाटील, चंद्रकांत भराडे, विनोद गवई उपस्थित होते. यावेळी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड ही चळवळ झाली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरी,परिसरात, मोकळ्या जागेत, फुलांची, फळांची तरी झाडे लावलीच पाहिजे. शासकीय काम म्हणून न पाहता आपले कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करावे असे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी व्यक्त केले.