विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्ते देऊन स्वागत, विद्यार्थी रमले शाळेत.

चाकूर : तालुक्यातील चापोली येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालयात ( दि१६) सोमवारी प्रवेशोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला.
शैक्षणिक वर्ष २०२५ ~२६ ची सुरुवात १६ जून रोजी झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा संचालक व्यंकटेश शिंदे, माधव मुर्गे (प्रा मु अ) यांच्याहस्ते पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे विद्यार्थी प्रफुल्लित झाली होती. प्रदीर्घ उन्हाळी सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत दाखल झाली आहेत. शाळेतील प्रांगणाला ही शोभा आली आहे. विद्यार्थी गुरुजनांच्या सानिध्यात रमू लागली आहेत. आनंदी वातावरणात शिक्षणाची धडे गिरवू लागली आहेत.
जागरूक पालक आपल्या पाल्यासह शाळेत येऊन प्रवेश देऊ इच्छित असल्याने बालकासमवेत पालकांचा ही सत्कार करण्यात आला.
पहिल्याच दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. मध्यान्ह भोजनात काजू बदाम युक्त गोडभात देऊन पहिला दिवस गोड करण्यात आला. विद्यालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शैक्षणिक वर्षांची आनंददायी सुरुवात झाली. विद्यार्थी गुरुजींच्या सानिध्यात रमली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यालयाच्या वतीने स्कूल बस ची व्यवस्था करण्यात आली आहे.
चापोलीसह पंचक्रोशीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा नावलौकिक आहे. इथे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बालमनावरती संस्कार घडवण्याचं काम केलं जातं.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली जाते. प्रतिवर्षी होणाऱ्या असंख्य स्पर्धा परीक्षेत येथील विद्यार्थी सहभागी होतात किंबहुना यशस्वी होऊन प्रथम – द्वितीय क्रमांक प्राप्त करतात. १० वी बोर्ड परीक्षेत तर केंद्रात प्रथम येण्याचा दबदबा कायम राखला आहे.