आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयव्यापारसामाजिक

सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने चाकुरात उभारणार शेतकरी भवन 

कोटी 52 लक्ष 69 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता.

  • सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने चाकुरात उभारणार शेतकरी भवन चाकूर (सुशील वाघमारे): राज्याचे सहकार मंत्री तथा चाकूर – अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने चाकूर येथे शेतकऱ्यांसाठी नवीन शेतकरी भवन उभारण्यात येणार असून शेतकरी भवन हे चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उभारण्यात येणार असून या शेतकरी भवन बांधकामासाठी 1 कोटी 52 लक्ष 69 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता शासनाने प्रदान केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत असे की नामदार बाबासाहेब पाटील एक स्वतः शेतकरी असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना त्यांना माहित आहेत. तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी विविध कामानिमित्त येतात, कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असतात. त्यांना या ठिकाणी थांबण्यासाठी कुठलीही एक महत्त्वाचे ठिकाण नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या गोष्टीची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या पुढाकारातून चाकूर येथे नव्याने कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूर येथे शेतकरी भवन बांधण्यासाठी 1 कोटी 52 लक्ष 69 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली असून सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून लवकरच या शेतकरी भवनाचे काम सुरू होईल अशी माहिती राज्याची सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. या शेतकरी भवनामुळे चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार मिळणार आहे.

 

त्यामुळे चाकूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आनंदी आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नामदार बाबासाहेब पाटील यांचे शेतकरी भवन च्या उभारणी बद्दल आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button