यशवंत प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी संपन्न
ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज महावार्ता न्यूज
अहमदपूर (महावार्ता न्यूज): येथील यशवंत प्राथमिक शाळेत वारकरी दिंडी संपन्न झाली.
या बाबत अधिक माहिती अशी की आषाढी एकादशी निमित्त अहमदपूर येथील यशवंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आयोजित करण्यात आलेली होती सदरील दिंडी शहरातील शिवाजी चौक, आझाद चौक, क्रांती चौक, पाटील गल्ली, आदी मुख्य रस्त्यावरून काढून या दिंडीत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते या शाळेतील चिमुकल्याने काढलेल्या या दिंडीचे सर्वत्र कौतुक होत आहे या दिंडीत विठ्ठल नामाचा गजर करीत टाळ मृदंगाच्या आवाजात अनेक चिमुकल्याने सहभाग घेतला होता या विद्यार्थ्याने वारकऱ्याचा वेश परिधान केला होता त्यामुळे ते अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेत होती.
सदरील दिंडी यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. पारशेट्टे , माधव भोजराज पाटील, एस एस बिराजदार,विलास चापोलीकर, एम. एम. शेख, आनंद बिरादार, गणेश मुसळे, यशवंत कोलपुसे, रवींद्र गेडाम, आश्विनी गोंड ,संदीप पांचाळ शिवशक्ति हिप्पाळे , आणि त्या रा बी. बी. शेवाळे श्रीमती नागपुरणे ,व्हि.व्हि. बिरादार, किरण आष्टे , सोपान बडगिरे, प्रशांत मोरे, अनिता राजे मॅडम, रेखा जोगदंड, महानंदा काळवणे, रेखा फड,बबन गोरगिळे यांनी परिश्रम घेतले.