दोषींवर कारवाईत दिरंगाई, तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांचा ठिय्या.
मातंग समाज आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचा अवमान, मातंग समाज आक्रमक
कारवाईसाठी कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयात ठिय्या
चाकूर: (महा वार्ता न्यूज) येथील भूमिअभिलेख कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा गुरुवारी दि. १९ जून रोजी अवमान करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. तद्नंतर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन जाब विचारला. सनसशील मार्गाने निवेदने दिली मात्र अद्याप कारवाई का होत नाही म्हणून सोमवारी तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्याच मांडला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या भूमि अभिलेख कार्यालयाच्या फुटक्या खिडकीला उलटी लटकावून पाणी आत येऊ नये म्हणून कोणत्या महाभागाने वापर केला असेल हे कोडेच आहे. पण असे करणे किती महागात पडेल याची जाणीव तरी का बरे नसावी? दर्शनी भागात असणाऱ्या खिडकीला उलटी लाटलेल्या अवस्थेत असणारी प्रतिमा मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाहून संबंधित विभागातील अधिकाऱ्याचा जाब विचारला निवेदने दिली. मात्र कारवाई काही होईन म्हणून सोमवारी दुपारी चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या दालनात कार्यकर्त्यांनी ठिय्याच मांडला.
दरम्यान मातंग समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांना निवेदन देऊन यात दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होताना दिसून येत आहे. तालुक्यातील मातंग समाज समाज आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.
तहसीलदार नरसिंग जाधव यांनी जिलाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
घटना निदर्शनास येताच मोठा जमाव कार्यालयात जमा झाला होता. दोषींवर कारवाई करण्याची मागणी रामेश्वर कसबे सह अन्य ३७ जनांना केली होती. दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यात सामील अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी केली जात आहे.
- कारवाई होत नसल्याने जिल्हाभरातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आता या घटनेकडे केंद्रीत होत आहे. त्वरित योग्य भूमिका घेतली नाही तर मातंग समाजाचा उद्रेक होईल असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी सुनील सौदागर, अविनाश कवडे, रामेश्वर कसबे, नितीन डांगे, पपण वैरागे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सदरील अवमान प्रकरणी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांत निषेधाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत किंबहून आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चर्चिले जात आहे.