मनोरंजन
पहलगाम हल्ल्याचा स्वामी विवेकानंद विद्यालयात निषेध.
काळी फित लावून विद्यार्थ्यासह शिक्षकांनी केले दैनंदिन कामकाज

चाकूर : तालुक्यातील चापोली येथील स्वामी विवेकानंद प्रा माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी जम्मू कश्मीर च्या पहलगाम घटनेच्या निषेधार्थ काळी फित लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी हजारो पर्यटक गेले होते. अचानक अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात अनेक भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. त्यांना स्वामी विवेकानंद प्रा माध्यमिक विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- सदरील भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून किशाला काळ्या पट्ट्या बांधून विद्यार्थ्यासह शिक्षकांनी दैनंदिन कामकाज पार पाडले. यावेळी घटनेचा थरार आणि मृतविषयी कृतज्ञता व्यक्त करत. मुख्याध्यापक व्यकटेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. पुढे बोलताना म्हणाले की मातृभूमीच्या रक्षणार्थ मुलामुलींनी सज्ज राहून सैन्यात भरती व्हावे. आपली भूमी वीरांची भूमी आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आज त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन देशसेवेसाठी सज्ज असायला हवे असे मत व्यक्त केले. व पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.