मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना हवाय कालावधी वाढवून.
चाकूरच्या तहसिलदारांना दिले निवेदन.

चाकूर प्रतिनीधी : चाकूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत अस्थापना प्रशिक्षणार्थ्यांनी विविध मागण्या संदर्भात तहसीलदार नरसिंग जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत अस्थापना प्रशिक्षणार्थी यांनी चाकूर तालुक्याचे तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य अस्थापना प्रशिक्षणार्थी असून या योजनेअंतर्गत शासकीय अस्थापनेतील विविध बाबीचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रशासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली असून शैक्षणिक वर्षाच्या अनुशंगाने सहा महिण्याचे प्रशिक्षण हे अपूरे होईल किमान शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची बाब विचाराधिन ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व शिकावू शिक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या अनुशंगाने शाळा सहाय्यक शिक्षकांना नियुक्त शाळेवर किमान एक वर्ष प्रशिक्षण मिळावे तसेच प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून मिळावा,प्रशिक्षणार्थीचे मानधन वेळेत मिळावे,रूजू प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून संबंधित प्रशिक्षानिर्थीना रूजू करून मानधन मिळावे, प्रशिक्षण घेत असलेल्या अस्थापनेमध्ये पदभरती करत असताना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर बसाप्पा तोडकरी,प्रद्युम्न चाटे,सुशील सिरसाठे,मंगेश पांचाळ,प्रशांत ढोबळे,सुषमा कोडे,भाग्यश्री शिंधीकूमटे, अनिता स्वामी, सुप्रिया टिकोरे, वैष्णवी महाजण, मनिषा मिरजगावे,दीपक केंद्रे,प्रताप सावंत,संतोष बने,संगम होनराव आदींच्या स्वाक्षरी आहेत.