पाच हजाराची लाच पडली महागात, ग्रामसेवक अडकला ACB च्या जाळ्यात.

चाकूर प्रतिनिधी : चाकूर तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयामध्येच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरू होती.
चाकूर पंचायत समिती कार्यालयाचा ग्रामसेवक तालुक्यातील रायवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जागेचा फेरफार करण्यासाठी यातील तक्रारदार पुरुष, वय 57 वर्षे
यांनी मौजे रायवाडी येथील त्यांचे पत्नीचे नावाचे राहते घर तारण ठेवून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे 15 लाख रुपये कर्ज घेतले असून सदर कर्जाची नोंद स्थावर मालमत्तेवर घेण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत रायवाडी येथील ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना 7,500/- रू. रकमेची मागणी केली होती तडजोडी अंती 6500/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून त्यापैकी 1000/- रुपये यापूर्वी स्वीकारले होते. आज रोजी उरलेले 5500/- रुपये मागणी केली असता सदर रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली होती. त्यावरून सदर सापळा कार्यवाही करण्यात आली आहे.
- दि. 13/01/2025 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक आलापुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे वर नमूद प्रलंबित कामासाठी 5500/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून सदर लाचेची रक्कम दि. 13/01/2025 रोजी स्वतःचे शासकीय कार्यालय येथे शासकीय पंचासमक्ष स्वीकारली आहे.आरोपी निवृत्ती तुकाराम आलापुरे , वय 36 वर्षे, पद – ग्रामसेवक , वर्ग-3, नेमणूक – ग्रामपंचायत कार्यालय रायवाडी, ता. चाकूर , जि.लातूर रा.म्हसोबा नगर, सारोळा रोड, लातूर या आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन किनगाव , जिल्हा लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.