आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

शिरूरचे पहिलवान बाबासाहेब पाटील बनले कॅबिनेटमंत्री. 

वीस वर्षानंतर मतदार संघाला मिळाला लाल दिवा. 

चाकूर (सुशील वाघमारे) : चाकूर अहमदपूर विधानसभा मतारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि इतिहासच घडला. काकानंतर पुतण्यानेही थेट मंत्रिमंडळात स्थान भूषविले. आ. बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून रविवारी (शिरूरचे पहिलवान बाबासाहेब पाटील बनले कॅबिनेटमंत्री. दि १५ ) शपथ घेताच चाकूर अहमदपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिवाळीनंतरही फटाक्यांची आतिषबाजी करून दिवाळी साजरी केली.

कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना ना. बाबासाहेब पाटील

 

 

रिपब्लिकन डायव्ही लोकशाही आघाडीच्या माध्यमातून 2009 साली विजयी होऊन पहिल्यांदा बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी विधानसभेत आपले पाऊल ठेवले. १०१४ ला झालेला पराभव स्वीकारत त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. तद्नंतर २०१९ च्या निवडणुकित विजय मिळवला आणि जनहितार्थ अनेक विकासाभिमुख कामे केली. त्यांना राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मतदारसंघात अडीच हजार कोटींची कामे केली. दहा वर्ष आमदार म्हणून कार्याचा अनुभव असणाऱ्या लोकप्रतिनधीला पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली. २०२४ च्या अटीतटीच्या लढतीत बाबासाहेब पाटील यांनी विजयश्री खेचून आणला पुन्हा आमदार झाले. आ. पाटील यांची राजकीय कारकीर्द पाहता , शिरूर ता. सोसायटी चेअरमन , सिनेट सदस्य, लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष यातच दहा वर्षाचा विधानसभा सदस्य म्हणून असलेला अनुभव. हा राजकीय वर्तुळातील अनुभव आणि सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, सहकार क्षेत्रातील प्रकल्प अनुभव पाहता आमदार बाबासाहेब पाटील यांचे सार्वभौम वलय दिसून येते.

 

प्रचंड इच्छाशक्ती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चाकूर अहमदपूर तालुक्यातील विकासाबरोबर कामे करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मिळवून आणला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार बाबासाहेब पाटील ओळखले जातात. स्वकर्तृत्व व सामाजिक जाण असणारे नेतृत्व असणारे बाबासाहेब पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री वर्णी लागली आहे.

रविवारच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. चाकूर अहमदपूर मतदारसंघात फटाक्यांची आशिषबाजी करत कार्यकर्त्यांनी दिवाळीनंतर ही दिवाळी साजरी केल्याचा अनुभव आला.ना.बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने वीस वर्षानंतर चाकूर अहमदपूर तालुक्याला लाल दिवा मिळाला. काका बाळासाहेब जाधव पाटील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात होते तर त्यांचा पुतण्या शिरूर ता. येथील अष्टपैलू नेतृत्व पहिलवान आ. बाबासाहेब पाटील यांनी थेट मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळवले आहे. याबद्दल सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. चाकूर अहमदपूर तालुक्यात हरित, औद्योगिक, क्रांती करत सुराज्य निर्माण करण्याचा मनोदय पूर्ण होईल असेच कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button