महापरिनिर्वाणदिनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना स्वामी विवेकानंद विद्यालयात अभिवादन
महावार्ता न्यूज

चाकूर : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चापोली येथे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवारी सकाळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी बालपणी प्रचंड हाल अपष्ट सहन करत शिक्षण घेतले आहे. तूप रोटीची, आयशो आराम जैन विलासाची अपेक्षा न करता सतत 18-18 तास अभ्यास करत. प्रचंड विधानसंपदा प्राप्त केली. प्रसंगी खांबावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. प्रचंड विद्वत्ता प्राप्त केली बॅरिस्टर झाले. त्यांना भूक होती ती पुस्तके वाचण्याची. पुस्तक वाचत असताना त्यांना तहानभूक कसल्याही प्रकारची लागत नव्हते पुस्तके ज्ञानाचे ते भुकेले होते. म्हणून विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखं ज्ञानपीपासू बनावे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे यांनी केले.
प्रसंगी मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव होनराव व सर्व शिक्षक उपस्थित होते.