महाराष्ट्र बंदला चापोलीत प्रचंड प्रतिसाद, आंबेडकरी तरुणांनी रस्त्यावर उतरत केला निषेध.

चाकूर :- परभणी येथे दि. 09 डिसेंबर 2024 रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाज कंटकाकडून झालेल्या तोडफोडीतच्या व संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या दि.16 सोमवारी महाराष्ट्र बंदला दलित युथ पँथर प्रदेश अध्यक्ष पॅंथर निलेश मोहिते यांनी जाहीर पाठिंबा देऊन दलित युथ पॅंथर शाखा चापोली च्या वतीने चापोली कडकडीत बंद ठेवण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भीमसैनिकांनी शाळा ,महाविद्यालय बंद ठेवू नये असे आव्हान केले.
परभणी येथील कोंबिंग ऑपरेशन द्वारे अनेकावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
सोमनाथ सूर्यवंशी या लॉ कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा यासह विविध मागण्यासाठी बंद पुकारला असल्याचे निवेदकानी सांगितले.
यावेळी दलित युथ पॅंथर संघटनेचे मराठवाडा संघटक सुशील सरकाळे जिल्हाध्यक्ष गोविंद कालवले जिल्हा सचिव आकाश कांबळे जिल्हा मीडिया प्रमुख आतिश सरकाळे ,हरीश कांबळे, गोपाळ सरकाळे, बाबुराव भालेराव, अण्णासाहेब कांबळे ,मिलिंद सरकाळे, रोहित कांबळे ,आकाश चापोलीकर ,माऊली चाटे, बालाजी कोरे ,आकाश सरकाळे, महादू कांबळे, बालाजी कांबळे , विनोद बोडके, सचिन सरकाळे, राम भालेराव, राज सरकाळे, गोविंद सरकाळे ,वैभव भालेराव,आनंद कांबळे, समाधान माने, बंटी दाभाडे ,भीमराव कांबळे, प्रमोद दाभाडे, किशोर भालेराव , पद्माकर, भालेराव अमर कांबळे पांडुरंग कांबळे व भीमसैनिक व ग्रामस्थ चापोली