चाकूरात आयुष्यमान भव मोहीमेचे सभापती ज्योती स्वामी द्वारा उद्घाटन
महावार्ता न्यूज/ सुशिल वाघमारे

चाकूर: आयुष्यमान योजनेचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा-महिला व बालकल्याण सभापती ज्योती स्वामी चाकूरात आयुष्यमान भव मोहीमेचे उद्घाटन
शासनाने सर्व सामान्य जनतेला मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी आयुष्यमान भव हि कल्याणकारी योजना सुरू केली असून सर्व आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांनी या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी व सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपंचायतीच्या महीला व बालकल्याण सभापती ज्योती ताई स्वामी यांनी केले.
केंद्र शासनाने देशातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आयुष्यमान भव योजना सुरू केली आहे.याची जनजागृती करण्यासाठी देशभरात आयुष्यमान भव मोहीम १७ सष्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे. आयुष्यमान भव मोहीमेचे उद्घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती ज्योती ताई स्वामी बोलत होत्या. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी सचिन राठोड हे होते.तर उद्घाटक म्हणून नगरपंचायतच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती स्वामी या होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून रूग्ण कल्याण समितीचे सदस्य शिवदर्शन स्वामी,वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ.श्रीप्रसाद आलुरे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना ज्योती ताई स्वामी म्हणाल्या की,या योजनेत नागरीकांना विविध आजारावर मोफत तपासणी व उपचार मिळणार आहेत.या योजनेचे नागरीकांना गोल्डन कार्ड व आभा कार्ड देण्यात येणार आहेत.त्याच्या आधारे शासनाने नियुक्त केलेली खाजगी दवाखाने व सरकारी दवाखान्यात नागरीकांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळणार असल्याचे सांगितले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन राठोड, डॉ.उल्हास लोखंडे यांनी योजनेची माहिती सांगुन लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी उपस्थित नागरिकांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लक्ष्मीकांत केंद्रे यांनी मानले.यावेळी डॉ.प्रियंका अंकुशे,अधिपरीचारीका गीता केंद्रे, सुवर्णा केंद्रे,आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, नागरीक आदि उपस्थित होते.