इंग्रजी भाषेतुन जग पाहाता येते -प्रा. डॉ. उर्मिला धाराशिवे महावार्ता न्यूज
दि.27/09/2023 महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

चाकूर (महावार्ता न्यूज )
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा म्हणुन इंग्रजी चे महत्व कोनीही नाकारू शकत नाही असे उद्गार डॉ. धाराशिवे यांनी काढले.
भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी ” भाषा, साहित्य व संस्कृती मंडळाचे” उद्घाटन 26 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी प्राचार्य डॉ. शेषेराव धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक प्रा. डॉ. उर्मिला धाराशिवे ( इंग्रजी ),प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार ढोले (मराठी), प्रा. डॉ. दिलीप गुंजरगे( हिंदी) , यांच्या सह प्रो. डॉ. राजेश तगडपल्लेवार, डॉ. शाम जाधव, प्रा. राजेश विभुते, हिंदी साहित्य मंडळ ची अध्यक्षा कळसे अमरजा, इंग्रजी अभ्यास मंडळाची अध्यक्षा बन तनुजा, मराठी अभ्यास मंडळाचा अध्यक्ष प्रशांत साळी यांच्या उपस्थितित संपन्न झाला.
पुढे बोलताना डॉ. धाराशिवे म्हणाल्या जगातील अनेक भाषा विधार्थ्यांनी शिकल्या पाहिजेत कोणतीही भाषा सिखायची असेल तर त्या भाषेचा शब्द संग्रह वाढवला पाहिजे, इंग्रजी भाषेच्या माध्यामातुनच जगातील ज्ञान प्राप्त करता येऊ शकते , इंग्रजी म्हणजे जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, अन्ड्रॉइड मोबाईल चा योग्य वापर केला तर अनेक विषयाचे व भाषेचे ज्ञान प्राप्त करता येते असे विचार मांडले.
प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना डॉ. गुंजरगे म्हणाले भाषा विना साहित्य असु शकत नाही, मानव आणि समाजाचं अस्तित्वचं भाषेमुळे आहे, भाषेचा संबंध समाज आणि संस्कृतीशी आहे, हिंदी भाषा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक आहे, भाषे शिवाय ज्ञान आणि सौंदर्याची अनुभूती होऊ शकत नाही राष्ट्राला एकसुत्रा मध्ये बांधण्याची क्षमता हिंदी भाषेमध्ये असुन आज हिंदी जगातील दुसऱ्या क्रंमाची भाषा बनली आहे, विद्यार्थ्यांनी तन आणि मनाने हिंदी भाषेचा अभ्यास केला तर असंख्य रोजगाराच्या संधी आहेत असे विचार व्यक्त केले.
डॉ. ढोले म्हणाले भाषा मानसाला संस्कारीत करते, शब्द रत्नासारखे असतात, शब्दातुनच प्रेम,वात्सल्य, मायेचा ओलावा निर्माण होतो, विद्यार्थ्यांनी भाषा कोणतीही असो शब्द सामर्थ्ये ग्रहण करून कठोर परिश्रमातुन स्पर्धा परीक्षेला सामोरे जा अशा संदेश विचार व्यक्त करतांना दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धोंडगे म्हणाले विद्यार्थ्यांनी अनेक भाषा शिकल्या पाहिजेत अनेक भाषेचे ज्ञान प्राप्त करणारा विधार्थी अनुवाद- द्विभाषिक म्हणुन आपलं करीअर निर्माण करू शकतो असे विचार व्यक्त केले.
विधार्थी मनोगतात महालिंगे ऐश्वर्या, कळसे अमरजा, लवटे प्रणिता यांनी आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो.डॉ. राजेश तगडपल्लेवार यांनी सुनासंचालन बसेट्टी नाकाडे, कोतवाल सिरीन यांनी केले, आभार प्रशांत साळी यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रो. डॉ. शिवानंद गिरी, डॉ. मगदुम बिदरे, प्रा. बबिता मानखेडकर, प्रा. मंगल माळवदकर, प्रा. व्यंकटेश माने, बाळासाहेब जाधव,सेवक सिध्देश्वर स्वामी, दत्ता कोकरे यांनी परिश्रम घेतले.