ग्राहक संरक्षण च्या वतीने विध्यार्थी ग्राहक जागृती अभियान महावार्ता न्यूज
दि. २७/९/२०२३ संपादक सुशिल वाघमारे

ग्राहक संरक्षण च्या वतीने विध्यार्थी ग्राहक जागृती अभियान महावार्ता न्यूज
लातूर प्रतिनिधी (महावार्ता न्यूज): विध्यार्थी हे उद्याचे प्रगत नागरिक आहेत. हे ग्राहक म्हणून वावरत असताना आपली जवाबदारी काय आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण परिषद लातूरच्या वतीने राजमाता कन्या प्रशाला,लातूर येथे सोमवारी सकाळी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य डॉ प्रल्हाद तिवारी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ग्राहक जागृती अभियानात ग्राहक व कायदा यबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु. अ प्रमिला भोसले यांनी केले तर आभार संतोष गुरव यांनी मांडले
यावेळी मुख्याध्यापिका प्रमिला भोसले, पर्यवेक्षक संतोष गुरव, विध्यार्थी ग्राहक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.