लिंगायत समाजाचे 9 ऑक्टोबर ला धरणे व 30 ऑक्टोबर ला धडक मोर्चा पहा खास वृतांत
महावार्ता न्यूज संपादक सुशिल वाघमारे

उदगीर : महावार्ता न्यूज लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी लातूर कलेक्टर ऑफिसवर 9 ऑक्टोबरला एक दिवसीय धरणे आंदोलन व 30 ऑक्टोबरला धडक मोर्चा या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक लातूर यांना निवेदन देण्यात आले.
सन 2004 पासून माला जंगम बेडा जंगम गुडगा जंगम व लिंगडेर या जातीच्या आरक्षणासाठी शिवा संघटनेने महाराष्ट्रात प्रचंड आंदोलने केली त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवा संघटनेच्या मागणीनुसार 18 जातींना ओबीसी व तीन जातींना एसबीसीचा दर्जा दिला, आज रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडे ,वीर शैव लिंगायत समाजातील 32 पोट जातींना ओबीसीचा दर्जा द्या ही मागणी प्रलंबित असून, त्यातली प्रमुख मागणी हिंदू लिंगायत असलेला बहुसंख्यांक समाज असून या समाजाला न्याय देण्यासाठी देण्यासाठी लातूर जिल्हाधिकाऱ्या समोर ,एकदिवशीय धरणे आंदोलन दिनांक 9 ऑक्टोबर रोजी करण्याचे ठरले आहे या उप रही शासनाने समाजाच्या भावनेची दखल नाही घेतली तर, लातूर जिल्ह्यातील हिंदू लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेऊन मागणी मंजूर करण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या आशयाचे निवेदन आज रोजी लातूर चे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक लातूर यांना देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या (1)हिंदू लिंगायत अशी नोंद असणाऱ्या वीरशैव लिंगायत समाज बांधवांना लिंगायत म्हणून ओबीसी आरक्षण द्या (2) महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये असणाऱ्या जातींना केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शिफारस करा, भक्ती स्थळाचा विकास करण्यासाठी 25 कोटी रुपये द्या (3)भक्ती स्थळ ते कपिलधार मनमत शिवलिंग पालखी मार्ग विकसित करा(4) श्रीक्षेत्र कपिलधार येथील शंभर कोटीचा विकास आराखडा लागू करा, (5)मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम तातडीने सुरू करा . या प्रमुख मागण्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन व 30 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक मनोहर धोंडे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गंजगोलाई ते जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सदरची बातमी आपल्या दैनिकात इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियावर प्रसिद्ध करून सामाजिक जागृती करून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अनुयायानी प्रचंड ताकतीने हा मोर्चे यशस्वी करावा असे आव्हान शिवा संघटनेचे प्रांत सदस्य दत्ताभाऊ खंकरे यांनी केले आहे. याप्रसंगी शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे ,औसा तालुक्याचे वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता, जगन्नाथ कोळंबे जिल्हा संघटक लातूर ,अंतेश्वर तोडकरी शिवा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष, अमित आठाने शहराध्यक्ष उदगीर रामेश्वर कदम तालुका अध्यक्ष उदगीर ,दिलीप अण्णा कत्ते तालुकाध्यक्ष निलंगा ,नगरसेवक संजय देशमुख तालुकाध्यक्ष, जळकोट, संतोष खिंडे तालुकाध्यक्ष देवणी, शरद चौधरी तालुकाध्यक्ष रेनापुर, आनंद अप्पा खंकरे तालुकाध्यक्ष अहमदपूर ,लातूर समाजाचे संचालक महादेव लामतुरे, शिवा संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष औसा रितेश राजट्टे, लातूर महानगराध्यक्ष शिवा संघटना संगमेश्वर स्वामी ,लातूर ग्रामीण तालुकाध्यक्ष ईश्वर बुलबुले,श्याम तोंडारे, इंजि. वैजनाथ बिरादार लोणीकर ,मीनाक्षी मुंदडा, बालाजी उदय हिंगणे ,पद्मिनी खराडे, शिवनंद दानई, सुरेखा बिडवे ,सरस्वती काळगापुरे, भाग्यश्री लखादिवे ,प्रभावती कदम.यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.