आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

स्वच्छतेसाठी एकवटले असंख्य हात, नगराध्यक्ष,IPS अधिकारी, विद्यार्थी, पत्रकार, रोटरी क्लब, सावलीही सहभागी. केले पथनाट्य, रॅली, वृक्षारोण

महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे

सेवा सप्ताहानिमित्त स्वच्छतेसाठी एकवटले असंख्य हात..
स्वामी विवेकानंद प्रा. माध्यमिक विद्यालय चापोलीच्या पथनाट्य, व स्वच्छता संदेश रॅली ने वेधले लक्ष.
चाकूर महावार्ता न्यूज : दि १. देशभरात महात्मा गांधी यांच्या जयंतनिमित्त स्वच्छ्ता मोहीम राबविली जात आहे. यानिमित्त चाकूर व परिसरात स्वच्छता ,वृक्षारोपण, स्वच्छतेचे संदेश देणारी रॅली, पथनाट्य असे उपक्रम घेण्यात आले. रविवारी दि १/१०/२०२३ सकाळी १० च्या सुमारास चाकूर येथे ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या मोहिमेची सुरुवात नगराध्यक्ष कपिल माकणे, सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, चेअरमन गोविंदराव माकणे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या उपस्थितीत मस्जिद चौक येथून करण्यात आली. कपिल माकणे, अजय नरळे, नगरसेवकांनी व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यानी स्वच्छता मोहिमेची हाती घेतली.

चाकूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, यांच्या उपस्थितीत सर्व पोलीस कर्मचऱ्यांनी परिसरतील कचरा गवत, उपसून परीसर स्वच्छ केला.

विशाल विविध सह सोसायटी चे चेअरमन डॉ गोविंदराव माकणे, सर्व संचालक मंडळ यांनी नगरपंचायत ते सोसायटी चौक परिसर झाडून स्वच्छ केला.

रोटरी क्लब चाकुर चे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, डॉ चंद्रप्रकाश नागिमे, सागर रेचवाडे, नारायण बेजगमवार,

चाकूर तालुका पत्रकार संघ, व्हॉईस ऑफ मिडिया, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अध्यक्ष,सचिव सह पत्रकार मित्र,

सावली फाउंडेशन चे डॉ श्रीनिवास हसनाळे, उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, डॉ दत्तात्र्यय सुवर्णकार, सरदार मंगरुळे, योगेश सोनटक्के, बालाजी स्वामी, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष सावली च्या ५० वृक्ष ट्री गार्ड सह लावण्यात आले.

चापोली येथील स्वामी विवकानंद विद्यालयाच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले . परिसरात रॅली काढून ओला सुका कचरा वेगळा करा, परीसर स्वच्छ करा, आरोग्याची काळजी घ्या, स्वच्छतागृहाचा वापर करा , कचरा घटागडीत टाका असा घरोघरी जावून संदेश दिला व मुख्याध्यापक व्यकटेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची शपथ घेतली

…स्मशाभूमीत भाजपा चे ता. अध्यक्ष वसंतराव डीगोळे, राष्ट्रवादी सेवा दलाचे ता. अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, रिपाई चे पपन कांबळे, दत्ता मुळे , प्रशांत बीबराळे, बाळू कांबळे,प्रकाश तेलंग यांच्या उपस्थितीत स्वच्छता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button