डी.बी. ग्रुप ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे GPAT मद्ये घवघवीत यश.
चाकुर प्रतिनिधि (सुशिल रंगनाथ वाघमारे)
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या GPAT परीक्षेत दिनेश बैबडे कॉलेज ऑफ फार्मसी, महाळंग्राच्या विद्यार्थांनी घवघवीत सुवर्ण यश संपादन केले आहे.राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे घेण्यात येणारी GPAT परीक्षा ही बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना एम.फार्मसी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजेची असून ही परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थांना एम.फार्मसी या संशोधनासाठी केंद्राकडून आर्थिक मानधन प्राप्त होते. या परीक्षेचे गुणांकन तीन वर्षासाठी उपयुक्त असते ज्यामुळे विद्यार्थांना पी.एच.डी. करण्यासाठीची पात्रता परीक्षा (PET Exam) न देता वेगवेगळ्या विद्यापीठात प्रवेश घेता येतो.
यावर्षी जाहीर झालेल्या निकालात दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी, महाळंग्रा मधील स्वप्निल बेळगे (AIR) ऑल इडिया रैंक ३२९५, अश्विनी रोडे अॉल इंडिया रैंक नर आणि विजय काळगे ऑल इंडिया रैंक १७४३२ घेऊन राष्ट्रीय स्तरावरील GPAT परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यशस्वी विद्यार्थांचे कौतुक करताना संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बेंबडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेतील यश संस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण यावर्षी महाविद्यालयातील बी. फार्मसीची पहिली गोल्डन बॅच पास होत असून त्या बॅचमधील विद्यार्थांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवून पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसमोर एक चांगला आदर्श घालून एका चांगल्या परंपरेला सुरुवात केली आहे.
यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करताना संस्थेच्या सचिव प्रणिताताई बेंबडे म्हणाल्या कि कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य असावे लागते ज्यामुळे असे निर्मळ यश विद्यार्थ्यांना मिळते, हे यश दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिरपेचात मानाचा तुरा लावल्याप्रमाणे असून हे टिकवण्यासाठी ज्युनियर विद्यार्थांनी भविष्यात पूर्ण तयारीने या परीक्षेला सामोरे जायला पाहिजे.
डि.बी.संकुलनाचे संचालक विवेक बेंबडे व शैक्षणिक संचालक स्नेहा बेंबड़े यानी सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.फार्मसीचे प्राचार्य डॉ.जयदीप यादव, एम. बी.ए.चे प्राचार्य डॉ. श्रीकांत ढगे व डी. बी.पब्लिक स्कूलचे प्राचार्य विशाल जाधव यांनी विद्यार्थांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेतील प्राध्यापक ऐश्वर्या नवरखेले, रतन घुले, जगदीश गिरी, गोपाळ शिंदे, शंतनू माने, ममता अबादार, वैष्णवी गोळे, अविनाश बिराजदार, पूजा उत्सुर्गे, मयूर मरेवार, गणेश सराफ, दत्ता सुरवसे, मोनिका इंगळे, स्वप्नाली दादेवाड, इरशाद शेख, असीमाबी ताबोळी, किणकर विकी, शिवाजी एडके, फहीम पठाण, शुभांगी बनसोडे आदी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बलवंत कांबळे, पांडुरंग बेंबडे,अक्षय बेंबडे, चव्हाण अनिल, चव्हाण गणेश, किसवे नेताजी, गायकवाड दत्ता, लासूणे आकाश, कोवळे किरण व ज्योतिराम पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले