आरोग्य व शिक्षण
ॲड. युवराज पाटील यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठातील तक्रार निवारण समितीवर निवड.
चाकूर (सुशिल वाघमारे)

– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या तक्रार निवारण कक्ष समितीवर सिनेट सदस्य ॲड.युवराज पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.
ही निवड कुलगुरु डॉ उद्धव भोसले यांनी केलेली आहे.विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सुर्यप्रकाश जाधव यांनी निवड झाल्याचे पञ देवून कळविले आहे. या समितीवर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्तरातून डॉ डी एम खंदारे, डॉ अशोक गवते, डॉ आशा मुंढे, डॉ आर एम जाधव, डॉ सुर्यप्रकाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
ॲड.युवराज पाटील यांच्या निवडीचे सर्वञ अभिनंदन होत आहे.