आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
संपादक सुशिल वाघमारे

चापोली: येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त रविवारी सकाळी ९:३० वाजता अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतासह अनेक देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. याचप्रमाणे शासकीय , निमशासकीय कार्यालये शाळा महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी होते. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी प्राथमिक चे मुख्याध्यापक माधव होनराव सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.