कृत्रिम पावसासाठी मनसे चे आंदोलन, बळीराजाला मनसेची साथ..
महावार्ता न्यूज: चाकूर/सुशिल वाघमारे

चाकूर प्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी ऐवजी शेतकऱ्यांसाठी “पाऊस आपल्या दारी” राबवावे
चाकूर येथे कृत्रिम पावसासाठी मनसेचे आंदोलन.
जवळपास अनेक विभागात गेली एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाळत असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांनी युद्ध पातळीवर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पाणी भरलेल्या ढगांवर सिल्व्हर अयोडाईड फवारून क्लाऊड शेडिंग करावी व फक्त एक पाऊस कमी पडल्या कारणाने जाणारे शेतकऱ्यांचे पीक वाचवावे या मागणीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी तहसील समोर धरणे दिले व तहसीलदारांना निवेदनही दिले.
शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर करणे,अग्रीम पीकविमा देणे,नुकसानभरपाई देणे गरजेचे आहेच परंतु कृत्रिम पाऊस पाडला तर याही परिस्थितीत काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होईल असे डॉ भिकाणे म्हणाले कारण चांगल्या जमिनीवरचे पीक अद्यापही तग धरून आहे. यावेळी सुरेश शेवाळे, बसवराज होनराव, नरसिंग गुंतापल्ले, चंद्रकांत मलिशे, शंकर पाटील, नरसिंग शेवाळे, विकास काळे, संतोष गायकवाड, प्रताप चव्हाण, मारु कोरे, शिवाजी कदम, शंकर सुधाकर, बाबुराव कोरे, विश्वनाथ स्वामी, दीपक मुदाळे, शिवसाब स्वामी,राजू काचे,मालू कोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.