तीर्थवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी चाकूर च्या न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ मोरगे.
महावार्ता न्यूज / सुशिल वाघमारे

चाकुर प्रतिनिधी-दिनांक २८ ऑगस्ट रोजी मौजे तिर्थवाडी ता.चाकुर येथे सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच हणमंत नरवटे तसेच उपसरपंच विजयकुमार शेटे व ग्रामसेविका मनीषा कैले उपस्थित होते, यावेळी ग्रामसभेमध्ये सूचक नागभूषण पाटील यांनी असा ठराव मांडला की, मौजे तिर्थवाडी तालुका चाकूर येथील तंटामुक्त समितीचे पुनर्गठन करण्यात यावे यावर सभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ॲड.रामचंद्र रघुनाथराव मोरगे यांची निवड करण्यात आली.

याप्रंसगी मन्मथआप्पा पालापुरे,ग्रामपंचायत सदस्य सोनल प्रशांत उस्तुर्गे,माजी तंटामुक्त अध्यक्ष दिपक पाटील,रामेश्वर पताळे,रामराव मलिदे,विश्वनाथ तत्तापुरे,देविदास तत्तापुरे, दिपक किशवे,नरसिंग नरवटे,अनिल रघुनाथ शेटे,गणेश मोरगे,संतोष ततापुरे,संदीप गुळवे,
संग्राम नरवटे,प्रभाकर नरवटे, माऊली किशवे,लक्ष्मण मलिदे,शिवलिंग लिगाडे,रघुनाथ बिरणाळे,मनोहर नरवटे,विरभद्र उस्तुर्गे,संतोष गुळवे,सुरेश नरवटे,माधव नरवटे, योगेश देवकते,सुरज उस्तुर्गे,गणेश उस्तुर्गे,संगमेश्वर बिरनाळे,मन्मथ लिगाडे व गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.