जगतजागृतीच्या संस्कार घाळापुरे याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
संपादक सुशिल वाघमारे

चाकूर: दि.२३ (महावार्ता न्यूज) जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकुर द्वारा संचलित जगत् जागृती विद्या मंदिर चाकूर च्या संस्कार घाळापुरे याची
51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक मिळवला आहे. अल्ट्रासोनिक साउंड सेंसर असलेली अंधाची काठी या विद्यार्थ्याने बनवली होती.
तसेच प्रयोगशाळा सहाय्यक समाधान बलभीम तलवारे यांनी प्रयोगशाळा सहाय्यक मधून ओळख शास्त्रज्ञाची हा उपक्रम घेऊन प्रथम क्रमांक मिळवला व जिल्हा स्तरावर त्यांचीही निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रयोगशाळा सहाय्यक यांचे अभिनंदन जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील चाकूरकर,अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी, उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार, सहसचिव बाबुराव बिडवे, कोषाध्यक्ष सोमनाथ स्वामी, तसेच संस्थेचे संचालक एडवोकेट विक्रम पाटील चाकूरकर ,विठ्ठलराव सोनटक्के ,एडवोकेट सुधाकर मोतीपवळे, शिवप्रसाद शेटे,महादेव काळोजी,राजकुमार कदम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नारागुडे, पर्यवेक्षक प्रदीप ऊस्तुर्गे आदींनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.