युवा पिढीने भविष्याचे ध्येय समोर ठेवून जगले पाहिजे करिअर मार्गदर्शक – सुरज मांदळे

किनगाव (प्रतिनिधी महावार्ता न्यूज)बीए बी कॉम , बी एससी पदवीधारण करणाऱ्या युवा पिढीने आई-वडिलांच्या स्वप्नांचीपूर्ती करण्यासाठी भविष्याचे ध्येय समोर ठेवून गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन आनंदी जीवन जगले पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय किनगाव आणि स्कील अकॅडमी लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात गुरुवार दि 4 जानेवारी रोजी स्किल अकॅडमी लातूरचे संचालक सुरज मांदळे यांनी केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ बबनराव बोडके होते तर प्रमुख मार्गदर्शक लातूर च्या स्किल अकॅडमी चे संचालक सुरज मांदळे, प्रमुख पाहुणे आवाज बहुजनाचा न्यूज चॅनलचे शिवाजीराव गायकवाड , प्रमुख उपस्थिती संपर्क प्रमुख उपप्रचार्य डॉ विठ्ठल चव्हाण यांची होती पुढे बोलताना मादळे म्हणाले कि,आमच्या स्किल अकॅडमीने महाविद्यालया सोबत दहा वर्षांचा सामजस्य करार केलेला असून विविध कोर्स ऑफलाइन आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील या संधीचा फायदा घेऊन कौशल्य विकसित करावे यामुळे नोकरी हमखास मिळू शकते असेही म्हणाले याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ बबनराव बोडके म्हणाले की युवा पिढीच्या अंगी गुणवत्ता आणि संभाषण कौशल्य असेल तर दुसऱ्याकडे नोकरी मागण्याची गरज पडणार नाही आपोआपच नोकरी मिळू शकते नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देणारे असून महाविद्यालयाने ,माहिती तंञज्ञान, बँकिंग ,कंपनी क्षेत्रात रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल याची काळजी घेताना स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी निर्माण केला आहे म्हणूनच महाविद्यालयात हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात भारत सरकार च्या स्किल करिअर अकॅडमी चा लाभ घेण्याचे आवाहन ही केले यामार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा डॉ प्रभाकर स्वामी यांनी केले तर शेवटी आभार प्रा संजय जगताप यांनी मांनले या कार्यक्रमासाठी परिश्रम प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे, प्रा बालाजी आचार्य, प्रा डॉ बळीराम पवार, प्रा डॉ सदाशिव वरवटे , प्रा डॉ भारत भदाडे , प्रा डॉ अनंत सोमवंशी, प्रा डॉ दर्शना कानवटे , प्रा पांडूरंग कांबळे , प्रा अजप फड , प्रा गोपाळ इंद्राळे आदिनी घेतले