स्काऊट गाईड ने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम निमित्त जनजागृती
घरोघरीं जावून लसीकरण, पोलिओ डोस घेण्यास सूचित केले.
चाकूर महावार्ता न्यूज : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी संपूर्ण देशात राबविण्यात येते.या मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्य़ातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.
मोहीम यशस्वीरित्या राबवून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी शेळगाव येथील शाहू विद्यालयातील स्काऊट व गाईड प्रत्येक घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. तसेच या मोहिमेअंतर्गत शनिवार दि.2 मार्च 2024 रोजी गावामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली.
या वेळी शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.जाधव जे.बी, भंडारे एस .पी.(A.N.M),पाखंडे ए. एस.(आशा कार्यकर्ती) बोंते एस.पी.(आशा कार्यकर्ती ),पांचाळ जी.पी.(अंगणवाडी कार्यकर्ती ),विद्यालयाचे मुख्याध्यापक हाके एन.बी. सुगावे बालाजी स्काऊट मास्टर, प्रधान डब्ल्यू.टी. पंचगल्ले विवेकानंद,पुष्कर संतोष, पंडित संजय, शुरकांबळे एस.एल. स्वामी ,मोहन दुधाटे सर, तोंडारे सुभाष, स्वामी नागनाथ, विद्यालयातील सर्व विद्यार्थी,गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.