स्वामी विवेकानंद ची दीपाली जिल्ह्यात सर्वप्रथम, अकांक्षा द्वितीय क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरव
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक लातूर

चाकूर प्र – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली ता चाकुर येथील विद्यार्थिनी कु.दिपाली नवनाथ यंचेवाड ही जिल्ह्यात प्रथम तर चर्चासत्र स्पर्धेत कु.आकांक्षा अजय बलशेटवार ही विद्यार्थिनी जिल्ह्यात द्वितीय आल्याबद्दल लातूर येथे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन रविवारी गौरवणायात आले.
यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खा. सुधाकर श्रंगारे , जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर, पोलिस अधिक्षक सोमय्या मुंढे , शिक्षणाधिकारी मापारी यांच्यासह अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती.
वरील गुणवंत विद्यार्थ्यांना मुसने एस.एस., अशोक कोतपोलू यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक व संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.