नौकरीची संधी पाहिजे असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी करा -प्रो.प्रतीक पितांबरे
महावार्ता न्यूज दि.२६/९/२०२३ -संपादक सुशिल वाघमारे

चाकूर (महावार्ता न्यूज) येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र व पितांबरे आयएएस स्पर्धा परीक्षा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. शेषराव धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली व स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रो. डॉ. शिवानंद गिरी, पितांबरे इन्स्ट्यूट चे डायरेक्टर प्रतीक पितांबरे, बालाकुमारन ( तमिळनाडू ) , डॉ. दत्तात्रय वाघुले, डॉ. भारत लासुरे यांच्या उपस्थित 25 सप्टेंबर 2023 सोमवार रोजी करण्यात आले होते.
पीतांबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे मार्गदर्शन पितांबरे इन्स्टिट्युट लातूर येथे प्रारंभ केले असुन कष्ठकरी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळवून देऊन ग्रामीण विद्यार्थी आयपीएस व आयएएस घडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, नौकरीची संधी जीवनांत प्राप्त करावयाची असेल तर स्पर्धा परीक्षेच्या तयारी शिवाय गत्यंतर नाही असे संबोधित केले
प्राचार्य डॉ. धोंडगे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड कष्ठाळू असुन त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याचं काम आम्हाला करावे लागणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी लागणारे अद्यावत माहिती असलेले ग्रंथ कॉलेज उपलब्ध करून देईल असे अभिवचन विद्यार्थ्यांना दिले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. गिरी , सुत्रसंचालन प्रा. राजेश विभुते तर आभार डॉ.नामदेव गौंड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मल्हारी जक्कलवाड, प्रा. माने. प्रा._ जगताप, सेवक एकनाथ भोसले, दत्ता कोकरे यांनी परिश्रम घेतले.