कपिलांनंद प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम, शेकडो रुग्णांची केली मोफत तपासणी व मोफत उपचार.
नगराध्यक्ष कपिल गोविंदराव माकने यांची सामजिक चळवळ

चाकूर: (महावार्ता न्यूज) चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपील माकणे व विशाल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डाॅ.गोविंदराव माकणे यांच्या पुढाकारातून आयोजीत करण्यात आलेल्या मोफत रोगनिदान व स्त्रीरोग तपासणी शिबीरात चारशे रुग्णांची तपासणी करून मोफत औषधाचे वाटप करण्यात आले.
श्री कपीलानंद प्रतिष्ठान व श्री साई हाॅस्पीटल अॅड क्रिटीकल केअर सेंटर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमीत्त हे शिबीर ठेवण्यात आलेल्या मोफत आले होते, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी नगराध्यक्ष कपील माकणे, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, सोसायटीचे चेअरमन डाॅ. गोविंदराव माकणे, गटनेते करीमसाहेब गुळवे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. युवराज पाटील, बालाजी पाटील, माजी नगराध्यक्ष मिलींद महालिंगे, नगरसेवक नितीन रेड्डी,साईप्रसाद हिप्पाळे,मुज्जमील सय्यद, भागवत फुले,पपन कांबळे,शिवदर्शन स्वामी, महमद सय्यद,बाळू लाटे,नरसिंग गोलावार, सुधाकर लोहारे,जाकीर कोतवाल,सागर होळदांडगे, अजय नाकाडे, नारायण बेजगमवार यांची उपस्थिती होती. यावेळी डाॅ. गणेश हलकंचे, डाॅ. मनिषा शेटे, डाॅ. आकाश स्वामी, डाॅ. इरशाद सय्यद, डाॅ. सागर गोरटे, डाॅ. महेश बिरादार, डाॅ. गणेश कुलकर्णी या तज्ञ डाॅक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
यावेळी तपासणीसाठी रुग्णांनी मोठ गर्दी केली होती त्याच्या सर्व मोफत तपासणी करून त्यांना औषधाचे वाटप करण्यात आले. यासाठी कपील आलमाजी, लक्ष्मण उमाटे, श्रीकांत चव्हाण यांनी पुढाकार घेतला.