
चाकूर महावार्ता न्यूज : नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयातील गांधी अध्यासन केंद्राच्या वतीने दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी हुतात्मादिनानिमित्त गांधी विचार व संस्कार शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ही शिष्यवृत्ती परीक्षा 100 गुणांची, 50 प्रश्नांची, 50 मिनिटांची आणि गांधी विचार व कार्यावर आधारित घेण्यात आली. या परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या परीक्षेला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातून 75 विद्यार्थी उपस्थित होते.
परीक्षा सुरू होण्याच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय वाघमारे आणि दैनिक पुण्यनगरीचे नळेगाव येथील वार्ताहर श्री दयानंद सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हातसुताचा व चंदनाचा हार घालून अभिवादन केले. याप्रसंगी दयानंद सूर्यवंशी व प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. ओमशिवा लिगाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अमोल पगार यांनी केले.
शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी करण्यासाठी डॉ. ओमशिवा लिगाडे, डॉ. अरविंद कदम, डॉ.अमोल पगार, प्रा. शिवकुमार हिंडे, प्रा. संतोष हुडगे, प्रा. राहुलदेव कदम,
ऋषिकेश शिरुरे, शिवाजी शिरुरे, भीमाशंकर सूर्यवंशी व विनोद सराफ यांनी प्रयत्न केले.