सामाजिक

बहुजनांच्या वेदनेचा सत्यशोधक एल्गार लोकशाहीर शिवशाहीर अण्णाभाऊ साठे – प्रा एम एम सुरणर

महावार्ता न्यूज

बहुजनांच्या वेदनेचा सत्यशोधक एल्गार शिवशाहिर, लोकशाहिर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे……….. प्रा एम एम सुरणर 

                      बहुजन या शब्दाची फोड करून परिवर्तनाचा वसा, आणि वारसा हा केवळ शिक्षणानेच समोर घेऊन जाता येतो हा जीवन संघर्ष ज्यांनी स्वताच्या क्रांतीकारी जीवनशैलीतुन दाखवुन देत या पृथ्वीतलावरची वैज्ञानिक भूमिका अतिशय सरल व सहज भाषेत समजावत असताना अण्णाभाऊ असे सांगतात की….

 

 _पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसुन ती दीन, दलित, कष्टकरी, मजुरांच्या तळहातावर तरली आहे_ हा वैज्ञानिक दृष्टिकोन छातीठोक सांगणारे साहित्यसम्राट कसे झाले ? त्यांचा जीवनप्रवास काय आहे? या अनेक गोष्टींचा तार्किक व सुक्ष्मदृष्ट्या अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की तुकाराम भाऊराव साठे हे जगविख्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे कसे झाले….?

घरामध्ये असणारे १८ विश्व दारिद्र्य सामाजिक विषमतेने ग्रासलेले परिजन आणि पोटाच्या खळगीसाठी पडेल ते काम आणि मिळेल ते दाम या अटीवर दिवस रात्र राबणारे कुटूंब भाऊराव आणि वालुबाई यांच्या गावी वाटेगावात निवडुगांच्या मांग वस्तीत १ ऑगस्ट १९२० रोजी तुकारामाचा जन्म झाला तसे पाहिले तर या महाराष्ट्राच्या मातीत अगोदरच सोळाव्या शतकात एका तुकारामाने या देशातील ब्राम्हणी व्यवस्था फाडुन समता प्रस्थापित करणारी गाथा लिहुन वर्णवाद्यांचे बिंग फोडुन टाकले होते याचाच काय तो परिणाम त्यांनी आपल्या गाथेतुन ऊपदेश देत _सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता?_ अशी सत्याची शिकवण देेणारे तुकाराम जगदगुरू झाले त्यांचांच सत्यशोधकी वारसा व क्रांतिकारी नाव तुकाराम हे अण्णाभाऊ ला लाभले जन्मताच ज्याच्या बाळगुट्टीसाठी पैसे नाही अशी विदारक स्थिती आणि मग भविष्याला कदाचित बाळाची गरज असावी यासाठी ईंग्रजाचा खजाना लुटूण आणणारा फकिरा आपल्या लुटीतल्या सुरती रूपयाच्या ओंजळीने बाळाला बाळगुट्टी पाजविण्यासाठी मदत करतो आणि त्याच बाळगुटीतुन तुकाराम अर्थात अण्णाभाऊ क्रांतिकारी विचाराने प्रेरित होवुन वाटेगाव ते मुंबईचा प्रवास पायाने पुर्ण करतो लोक सांगतात की अण्णाभाऊ दीड दिवसाची शाळा शिकले? पण आजही त्यांच्याच साहित्यावर हजारो लोक अनेक डिग्रा मिळवतात ही काही सर्वसाधारण बाब नाही.

 

अण्णाभाऊच्या संघर्षाला वास्तविकतेची जोड देत जर अभ्यासले तर आज लक्षात येईल की त्यांचा लढा व संघर्ष सत्याच्या बाजुने व स्वाभिमानी होता…

म्हणुन एकेठिकाणी एक कवी असे लिहितो की

 

अण्णा तुम्ही ईथल्या वर्णवादी व वर्गवाद्यांची चामडी सोलुन आपली डफ मडवलीत……

अन् शाळेची पायरीही न चढता तुम्ही अनेक विद्यापीठे घडवलीत……

 

तुम्ही गात होतात, लिहित होतात, 

माणसांचे दु:ख व आसवांच्या कथा महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांची व्यथा….

 

तुमचं गाण साऱ्या जगाने एेकलं पण कुणीही तुम्हाला पोटाशी नाही लावलं…

 

बरं केलत अण्णा तुम्ही शेवटी आपली नाळ निळाईशी जोडलीत 

 

अन म्हणालात जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भिमराव……..

 

खरेतर या एका कवनातच तुम्ही तुमच्या सत्यशोधक लढ्याची प्रेरणा व ऊर्जेचा स्त्रोत सांगुन गेलात.

 

तसा विचार केला तर या जगात अनेक विचारवंतानी व तत्ववेत्यांनी असे नमुद केले आहे की शिक्षण घेतल्याने व्यक्ती आपल्याला अपेक्षित असणाऱ्या पदावर जाण्यासाठी मदत होते तथा शिक्षणाने डॉक्टर, ईंजिनीअर, वकील, कलेक्टर, आधिकारी, लेखक, साहित्यीक व विचारवंत होवु शकतो परंतु मित्रानों दीड दिवसाची किंवा रात्रीची शाळा शिकुन देखील भारताचे मॅग्झीन गाॅर्की होता येते हा नियम जगाला शिकवणारे एेकमेव जगविख्यात सत्यशोधक , शिवशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शिवाय दुसरे नाव नाही…

 

मित्रांनो आज आपण २१ व्या शतकात जीवन जगत असताना जातीयतेचे चटके आजही अनेक बहुजनांना सहन करावे लागतात ईतकेच काय तर कालची मनिपुरची लाजिरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी अतिशय विकृत मानसिकता आपल्या देशाची अब्रु वेशाला टांगणारी आहे तरीदेखील हजारो पत्रकार, न्युज चॅनेलस, साहित्यीक, लेखक, कवी या लाजिरवाणी बाबीला सत्यशोधक पध्दतीने जगासमोर मांडन्याचे साहस व धाडस करू शकत नाहीत तर मग अशा लेखक व पत्रकारांच्या लेखण्या काय चाटायच्या आहेत काय?….

 

विचार करा मित्रांनो ज्या काळात अस्पृश्यांना बोलायची बंदी होती, लिहायची बंदी होती, शिकायची बंदी होती अशा काळात अण्णाभाउने केलेले साहस आणि धाडस आजही ईतिहासात वाचायला मिळतो की १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि परंतु त्या स्वांतत्र्यामध्ये बहुजनांचे स्थान कोठे आहे? असा खडा सवाल करत हे स्वातंत्र हे शेठजी, भटजी आणि लाटजी यांचे आहे असे म्हणत ….यह आझादी झुठी है, देशकी जनता भूखी है …असे ब्रीदवाक्य सांगत या स्वातंत्र्याचा कडा विरोध अण्णाभाऊने केला हा ईतिहास देखील नाकारता येत नाही?……

 

ज्या व्यक्तीने जगजाहीर या खोट्या स्वातंत्र्याचा विरोध केला व बहुजनांना जागे करण्यासाठी आपल्या साहित्याच्या माध्यमातुन बहुजनांच्या कोट्यावधी वेदनेचा हुंकार अण्णाभाऊची लेखणी बनली…..

आज लोक मराठी दिवस म्हणुन ज्याच्या नावाने साजरा करतात त्या कवीने आपल्या कोणत्याच कवीतेतुन जगाचे दुख समोर आणण्यासाठी प्रयत्न केले नाही खरेतर ज्या अण्णाभाऊने आपल्या लेखणीच्या माध्यमातुन छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची यशोगाथा पोवाड्याच्या माध्यमातुन केवळ भारतातच नव्हे तर रशियाच्या चौका चौकात छत्रपतींच्या शौर्याची गौरवगाथा मांडणारे सत्यशोधक शिवशाहिर अर्थात लोकशाहिर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बनले…..

 

ज्यांची ग्रथंसंपदा किंवा साहित्याची यादी पाहता…

 

१३ कथासंग्रह

१३ लोकनाट्य 

३ नाटके

 ३५ कादंबऱ्या 

१ शाहीरी पुस्तक 

१५ पोवाडे 

१ प्रवास वर्णन

 ७ चित्रपट कथा

असा हा संघर्षमय जीवनपट पाहता मराठी दिवस हा केवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याच्यांच नावाने असले पाहिजे…. 

आजच्या काळातदेखील हजारो संधी ऊपलब्ध असतानाही का अजुन एखादाही साहित्यीक असा लिहु शकत नाही ज्याची वैचारिकता महामानवाच्या परिवर्तनवादी विचारांना पुढे घेऊन जाताना अनुयायी तयार करण्याची जबाबदारी असली पाहिजे…..आजची मणिपुर येथील महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढुन कोणता पुरूषार्थ गाजवतायत काय माह्ती??? मग सदरील ही परिस्थिती पाहता अण्णाभाऊनी लिहीलेल्या काही ओळी अाठवतात त्या अशा…

 *_ईथली न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली, 

ईथली संसद देखील हिझड्यांची हवेली झाली मग मी माझ्या व्यथा कुणासमोर मांडू कारण ईथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…*_ 

बांधवानो ज्या काळात अण्णाभाऊने आपला क्रांतीच्या जीवनाचा प्रवास सुरू केला त्यात त्यांनी शेकडो काम केले त्यात ते प्रामुख्याने गिरणी कामगार,रंगारी,चौकीदार अशा कित्येक तरी गोष्टी त्यांनी स्वाभिमानाने स्वीकारून पुर्ण केल्या म्हणुनच काय तर अण्णाभाऊंची एक कादंबरी रशियात पोहचली आणि गजब झाला सुल्तान फेम अण्णाभाऊ चित्तोड की राणी या विमानाने ते रशियात गेले हा त्यांच्या आयुष्याला एका वेगळ्या वाटेने घेऊन जाणारा प्रसंग ठरला गेला….

 

तरीपण अण्णाभाऊंच्या लेखणीचे वैशिष्ट्ये तर वास्तवाशी संबंधित होते त्यासाठी त्यांच्या प्रत्येक कथेचा नायक आणि नायिका जीवनातील वास्तविकतेचे दर्शन करणारे ठरतात, अन्यायाला वाचा फोडणारे ठरतात त्यात प्रामुख्याने फकिरा , माकडीचा माळ, वैजयंती, बुध्दाची शपथ अशा अनेक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव अण्णाभाऊच्या लेखणीवर होता असे म्हणाले तर काही वावगे ठरणार नाही.

म्हणुनच शेवटी अण्णाभाऊनी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक व सामाजिक गुरू मानुन जीवनभर संघर्ष केला व म्हणाले जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भिमराव……..

असे सांगत अण्णाभाऊने बहुजन समाजातील लोकांना एक संदेश दिला तो संदेशच अण्णाभाऊनी फकिराच्या माध्यमातुन लिहून महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली समोर याच कांदबरीला पुरस्कार प्राप्त झाला…..

 

अशा महान सत्यशोधक शिवशाहीरांची जयंती त्यांच्या अनुषंगाने सर्वांना क्रांतिकारी सदिच्छा…..

 

लेखक विचारवंत व्याख्याते 

प्रा.एम.एम. सुरनर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button