भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे

चाकूर ,दि.२७(प्रतिनिधी महावार्ता न्यूज) येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास शिबिर हाळी (खुर्द) येथे होत असून या शिबिराचे उद्घाटन तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवक -युवती विशेष शिबिराचे आयोजन दि.२४ ते ३० जानेवारी या कालावधीत संपन्न होत असून याचे उदघाटन तहसिलदार देवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अँड.पी.डी.कदम हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.सर्जेराव शिंदे ,सरपंच प्रचिता भोसले ,प्रा.बाळासाहेब बचाटे,वैशपायन करडीले आदी उपस्थित होते.यावेळी रासेयोच्या वतीने मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाधिकारी प्रा.डाँ.नामदेव गौंड,प्रा.मंगल माळवदकर ,प्रा.रमेश शिंदे ,प्रा.डाँ.सुमित देशमुख यांनी केला .यावेळी तहसिलदार यांनी “युवकांनी मतदार नोंदणी करून मतदानाचे महत्त्व काय आहे ते या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना सांगावे असे आवाहान केले .प्राचार्य डाँ.शिंदे यांनी “या शिबिराच्या माध्यमातून युवकांनी पर्यावरण ,अंधश्रध्दा निर्मुलन,जलयुक्त शिवार अभियान या संदर्भात नागरिकांना माहिती देऊन शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले तर अध्यक्षीय समारोपात अँड.कदम यांनी “युवकांनी या शिबिराचा लाभ ग्रामस्थाना द्यावा या माध्यमातून अनेक प्रकल्प या गावात राबविण्यासाठी जनजागृती करावी तसेच युवकांनी आपला सर्वागीण विकास करण्या बरोबरच ग्रामीण भागातील अनेक समस्यावर प्रसार करावा असे सांगितले .या कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रमाधिकारी प्रा.मंगल माळवदकर यांनी केले .
सुञसंचलन कार्यक्रमाधिकारी डाँ.नामदेव गौंड यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.रमेश शिंदे यांनी मानले. यावेळी डाँ.रमेश साळी ,डाँ.शिवानंद गिरी , डाँ.बी.डी.पवार ,प्रा.बबीता मानखेडकर ,प्रा.सुलभा गायकवाड ,प्रा.स्वाती नागराळे ,हिरामन राठोड ,यांच्या सह प्राध्यापक ,विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.