राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे युवाशक्ती ला आत्मनिर्भरते कडे घेऊन जाणारे आहे -प्र. कुलगुरू डॉ. बिसेन
चाकूर ( महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे)

भारतात स्वातंत्र्या नंतर दोन वेळा व १९८६ नंतर चौतिस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडा नंतर शैक्षणिक धोरणात बदल होत आहे, जगभर भारताची ओळख युवाराष्ट्र म्हणून होत आहे , मेकालेची शिक्षण पद्धतीतुन क्लार्क आणि सनदी अधिकारी निर्माण झाल्यामुळे देशाचा उत्कर्ष होणार नाही ही शिक्षण पद्धती कालबाह्य झाली असुन, वैज्ञानिक प्रगतीमुळे संशोधनाचे नव-नवीन दालने निर्माण झाली आहेत , एकेकाळी भारताची जगाला ज्ञान देणारा देश म्हणुन ओळख होती ,पुन्हा नवीन क्षैक्षणिक धोरणात तरुणाईच्या ऊर्जेला व क्षमतेला दिशा मिळणार आहे असे उद्गार प्र. कुलगुरू डॉ. बिसेन यांनी काढले.
भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यामाने ” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020″ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव अॅड पी.डी. कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेद्रंसिंह बिसेन तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. शेषेराव धोंडगे ,प्राचार्य डॉ. संजय वाघमारे ( अधिसभा सदस्य ), प्राचार्य डॉ. धंनजय चाटे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संतराम मुंढे, अधिसभा सदस्य अॅड. युवराज पाटील, क्रीडा अध्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास पाळणे उपस्थित होते.
पूढे बोलताना डॉ. बिसेन म्हणाले नवीन शिक्षा धोरण हे भारत केंद्रीत असुन भारतातील साधन- सामग्री व मनुष्यबळ निर्माण करणारे विद्यार्थी केंद्रीत धोरण असुन विषय निवडीचे स्वातंत्र्य विधार्थ्यांना असणार आहे. विद्यार्थ्यांना सर्वच ज्ञान शाखेच्या विषयाचा अभ्यास व कौशल्य विकासाभिमुख शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातुन मिळणार आहे, कला- वाणिज्य- विज्ञान- अभियांत्रिकी- फार्मसी – कौशल्य शिक्षणामुळे भारतीय तरुण आत्मनिर्भर बनणार आहे, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कैडैट कोर, युवक महोत्सव आदि क्षेत्रातील प्राप्त केलेले पुरस्कार व कार्य श्रेयांका अकाऊंट मध्ये जमा होणार आहेत , या शिक्षणातुन युवाशक्ती आत्मनिर्भर बनेल असे संबोधित केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी अँड कदम साहेब म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे तरुणाईला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील , प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे व सामाजात जाग्रती निर्माण करावी हे शैक्षणिक धोरण आपल्या पाल्याला आत्मनिर्भर बनवणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. शेषेराव धोंडगे यांनी तर सुत्रसंचालन प्रो. डॉ. राजेश तगडपल्लेवार, आभार प्रा. राजेश विभुते यांनी मानले, कार्यक्रमास संजीवनी महाविद्यालय चापोली , शिवजागृती महाविद्यालय नवेगाव, भाई किशनराव देशमुख महाविद्यालयातील सवे प्राध्यापक सहभागी झाले होते, कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने झाली.