आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली श्री गणेशाची आरती
गणपती बाप्पा ला घातले भरपूर पाऊस पडण्याचे साकडे

लातूर महावार्ता न्यूज: चाकूर येथील आपला गणेश ची आरती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांचा गणेश मंडळाचे प्रमुख सागरभैया होळदांडगे यांनी शॉल, श्रीफळ व आंब्याचे रोपटे देऊन सत्कार केला. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील, नगराध्यक्ष कपिलभैया माकणे, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन रेड्डी उपस्थित होते.
चाकूरच्या मुख्य बाजारपेठेतील आपला गणेश मंडळाच्या वतीने आरतीच्या यजमानांचा सत्कार करून वृक्षांचे रोपटे भेट देण्यात येत आहेत. गणपती चा प्रसाद म्हणून वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा संदेश यामध्यामातून देण्यात येत आहे. आपला गणेश मंडळाच्या आरतीस संभाजी सोनटक्के, मारुती सुर्यवंशी, विशाल विविध सेवा सोसायटी चे संचालक अजयकुमार नाकाडे, लातूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, मंगेश स्वामी, उद्योजक संगमेश्वर लाटे, मोहम्मद शेख, सुरेश होळदांडगे, विश्वजीत होळदांडगे, शुभम सोनटक्के, पृथ्वीराज होळदांडगे, गणेश आलमाजी, अजय पटने, सावता परिषदेचे आत्माराम डाके, अभिजित कामजळगे, धिरज हिप्पाळे, शिवशरण सोनटक्के, अरविंद भालेराव, गणेश पाटील, राम पाटील, अलीम शेख यांच्यासह व्यापारी, लोक्रतिनिधी, भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.