आरोग्य व शिक्षण

पतसंस्था स्वबळावर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची अध्यक्ष शरद हुडगे यांची ग्वाही

गुणवंत विद्यार्थी शिक्षक, पुरस्कार प्राप्त शिक्षक, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार.

चाकूर प्रतिनिधी: येथील “माझी माय”मंगल कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.ता. चाकूरची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
सभेचे अध्यक्षस्थान अहमदपूर – चाकूर मतदार संघाचे आमदार सन्माननीय बाबासाहेब पाटील यांनी भूषवले तर उद्घाटन ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.स्वागताध्यक्ष चाकूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष कपिल माकणे तर व्यासपीठावर माजी आमदार बब्रुवान खंदाडे ,जिल्हा बँकेचे संचालक एन.आर. पाटील , पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन चनाप्पा मुदगडे , माजी अध्यक्ष शादुल शेख,माजी जि.प.सदस्य रामराव बुदरे, उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष धनंजय गुडसुरकर, वि.का.सोसायटीचे चेअरमन गोविंदराव माकणे, गटशिक्षणाधिकारी संजय अलमले, रेणापूर पतसंस्थेचे अध्यक्ष गोपाळ पडीले , शिरूर अनंतपाळ पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद हांद्राळे बावचे आदी मान्यवर उपस्थित होते.

पतसंस्थेचे अध्यक्ष शरद हुडगे यांनी प्रास्ताविकात पतसंस्था राबवित असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली व सर्व लेखाजोखा सभेसमोर मांडला. व सर्वांचे आभार मानले.
लातूर रोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलींनी सादर केलेल्या विविध गितांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी बोलताना ह.भ प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गुरुही विश्वाला दिशा दाखवणारी व्यक्ती असते. शिक्षकांवर समाज आणि राष्ट्र घडविण्याची फार मोठे जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य आपल्या हाती आहे आणि आपण ते चांगल्या पद्धतीने करीत आहोत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पतसंस्थेने राबवलेल्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

जिल्हा बँकेचे संचालक एन. आर. पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले. माजी आ. बब्रुवान खंदाडे यांचेही याप्रसंगी समयोचीत भाषण केले. द्वितीय सत्रात प्रश्न उत्तरे व पतसंस्थेच्या भावी वाटचालीत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना मान्यता घेण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत भोजने, सचिव प्रल्हाद इगे,खजिनदार राम कवाळे, संचालक माधव बेल्लेवाड , बालाजी येळापुरे ,संगमेश्वर ढगे वीरभद्र बावगे,बालाजी डावळे सुरेश वंगवाड, माधव खलसे,संतोष पाटील,नागेश माने ,प्रभावती फड, गोपिका बुड्डे शादुल शेख,प्रभावती मोतीपवळे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद हुडगे तर आभार बालाजी येळापुरे, सुरेश वंगवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button