मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, टँकर मुक्त करण्यासाठी शास्वत विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे – खा शृंगारे
महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे उदगीर

उदगीर शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला ‘महानाट्य बखर हौतात्म्याची’ या कार्यक्रमास उपस्थित राहून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी खा सुधाकर शृंगारे यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना, खा सुधाकर शृंगारे म्हणाले की देशाला स्वातंत्र्य १९४७ साली मिळालं, मराठवाड्याला स्वातंत्र्यासाठी १९४८ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष नेहमीच अपूर्ण राहिलेला असून तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. शेती, आरोग्य, विकास, शिक्षण, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रांमध्ये येणाऱ्या काळात मराठवाड्याचा मागे पडलेला आलेख भरून काढला जाईल अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना दिली.
मराठवाड्यातील दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी, मराठवाड्यातील युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, मराठवाड्याला टँकर मुक्त करण्यासाठी व मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन देखील यावेळी केले.
याप्रसंगी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. संजयजी बनसोडे, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, संस्थाचालक सुपोषपाणी आर्य, रामचंद्र तिरुके, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, अमोल निडवदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, श्रीमंत सोनाळे यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.