लातूर पोलिसांची सायबर क्राईम बाबत जनजागृती
महावार्ता न्यूज संपादक (सुशिल रंगनाथ वाघमारे )

*सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती; लातूर पोलिसांचा उपक्रम.*.
लातूर: प्रतिनिधी (सुशिल रंगनाथ वाघमारे) पोलिसांचे वतीने सायबर गुन्ह्यांबाबत माहिती व्हावी यासाठी सायबर गुन्हे जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, फसवणूक झाल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधावा तसेच सायबर गुन्ह्यांबाबतचे कायदे, समाजमाध्यमांतून होणारे लैंगिक छळ, ऑनलाइन व्यवहारात होणारी फसवणूक आणि त्यापासून बचाव यासर्व गोष्टींची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे कल दिसून येतो. असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. तसेच काही नागरिक जास्त पैसे मिळविण्याच्या किंवा कमविण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याविषयीची सर्व गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतात. याचाच फायदा घेत काही भामट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच तरुण-तरुणी आपल्या खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्या बाबतचा ट्रेंड दिसून येत आहे. याच खासगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे उकळतात. या प्रकारच्या गुन्ह्यांबाबत कुठे तक्रार करावी, सायबर गुन्हे शाखेशी कसा संपर्क साधावा तसेच सायबरक्राईम या संकेत स्थळाला भेट देणे याबाबत जनजागृती व्हावी यासाठी हे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविले जात आहे.
सायबर गुन्ह्यांच्या प्रकाराबाबत माहिती, आपली फसवणूक कशी होऊ शकते, मुलांच्या हातात मोबाइल दिल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, नोकरीबाबतचे खोटे संदेश ओळखणे, महिलांचे लैंगिक छळ करण्यासाठी गुन्हेगार कोणती प्रणाली वापरतात, सुरक्षित इंटरनेटचा वापर कसा करावा. याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 26/07/2023 रोजी बीएसएफ कॅम्प चाकूर येथे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी “सायबर सुरक्षा सायबर साक्षरता व ऑनलाइन फ्रॉड” याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सदर मुद्द्यांची माहिती देण्यात आली.
सायबर क्राईम म्हणजे काय याची माहिती देण्यात आली.सायबर क्राईम चे प्रकार याची माहिती देण्यात आली.
हॅकिंग:-यामध्ये हॅकर्स संगणकाच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून त्यांच्या परवानगीशिवाय संवेदनशील व वैयक्तिक माहिती मिळवतात.
सायबर स्टॉकिंग :- ज्यामध्ये पीडीतेचा सोशल मीडिया व संदेश दळणवळणाच्या ऑनलाइन माध्यमातून त्रास दिला जातो.
ओळख चोरी(आयडेंटीटी थेफ्ट):-हा गुन्हा सर्वाधिक घडताना दिसतो यामध्ये जे लोक बँकेचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करतात त्यांना प्रामुख्याने टार्गेट करण्यात येते.
क्रेडिट आणि डेबिट कार्ड फ्रॉड: अनोळखी व्यक्ती कॉल करून बँकेतून बोलण्याचे भासवून आपली वयक्तिक माहिती (अकाउंट नंबर, कार्ड नंबर,PIN, OTP इत्यादी) मिळवून फ्रॉड करतात.
बाल लैंगिकता व गैरवर्तन: यामध्ये बहुतेक सायबर गुन्हेगार स्वतःची ओळख लपवून अल्पवयीन मुलांशी संवाद साधतात.
वेब हायजॅक:-यामध्ये एखाद्या व्यक्तीची वेबसाईट बेकायदेशीरपणे हॅक केली जाते व त्यामुळे मुळ मालक त्याचे नियंत्रण व संवेदनशील डाटा गमावतो.
खोट्या खरेदी विक्री वेबसाईट: खोट्या वेबसाइट्चा वापर करून कमी किमतीत वस्तू विकण्याचे आमिष देऊन फ्रॉड केला जातो.
फिशिंग:-प्रामुख्याने लॉटरी, लकी ड्रॉ इत्यादी जिंकल्याचे भासवून, पैशांचे लालच दाखवून त्यांचे ओटीपी व बँक डिटेल मिळवून फ्रॉड केला जातो.
QR Code फ्रॉड: अनोळखी व्यक्ती आपल्याशी व्यापार, खरेदी विक्री, बँक प्रतिनिधी भासवून संपर्क करतात आणि QR code पाठवून आपल्या account मधील पैसे चोरी करतात.
Sextortion: यामधे अनोळखी व्यक्ती महिला असल्याचे भासवून आपल्याशी सोशल मीडिया वर मैत्री करतात काही दिवस चॅटिंग केल्यावर व्हिडिओ कॉल ची मागणी करतात आणि त्या दरम्यान समोरून अश्लील व्हिडिओ प्ले करून आपला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात. ह्या व्हिडिओ चा वापर आपली बदनामी करण्यासाठी करून आपल्याकडून खंडणी उकळतात.तसेच इंटरनेटचा वापर करताना काय करू नये याबाबत खालील प्रमाणे माहिती देण्यात आली.सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी स्त्री किंवा पुरुष यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.कोणत्याही अनोळखी इसमाचा कॉल आल्यास आपला ओटीपी किंवा बँक डिटेल, यूपीआय आयडी कोणासही शेअर करू नये.ऑनलाइन फोन किंवा कोणत्याही ॲपच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या अमिषाला बळी पडू नये.
सोशल मीडियाचे आपले प्रोफाइल लॉक करून ठेवावेत.आपल्या मोबाईल मध्ये अनोळखी लोकांनी पाठवलेल्या कोणत्याही लिंक वरती क्लिक करू नये.अनोळखी नंबरचा व्हिडिओ कॉल आल्यास व्हिडिओ कॉल उचलू नये.कोणत्याही अनोळखी इसमाने पाठवलेला QR कोड स्कॅन करू नये.
वरीप्रमाणे फ्रॉड झाल्यास काय करावे…
सायबर पोलिस स्टेशन संपर्क करावा..NCCRP PORTAL/cybercrime.gov.in वर तक्रार करावी.
1930 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा.या नंबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर फार प्रभावी ठरतो. सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, फसवणूक होऊ नये यासाठी कसे सतर्क रहावे, या हेतून हे जनजागृती अभियान राबविले जात आहे.