ताज्या घडामोडी

शिधापत्रिकाधारकांच्या खात्यात अन्नधान्याऐवजी पैसे होणार जमा.

लातूर (महावार्ता न्यूज/ सुशिल वाघमारे)


आपल्या राज्यात शासनाने 1 जानेवारी 2023 पासून राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्या 14 जिल्ह्यात लातूर जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील 53 हजार 63 इतक्या शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून लाभधारक व्यक्तींची एकूण संख्या 2 लाख 48 हजार 670 एवढी आहे. आजपर्यंत 17 हजार 798 लाभार्थ्यांना लाभ दिला असून 80 लाख 8 हजार 950 एवढी रक्कम आज रोजी वाटप करण्यात आली आहे.
अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियमांतर्गत प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमहा प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य रुपये प्रतिकिलो गहू व रुपये 3 प्रतिकिलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. मात्र या योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रांन्सफर – डिबीटी) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून अशा दोन टप्प्यांत सहा महिन्यांच्या धान्याऐवजी रक्कम देण्यासाठी पुरवठा विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी दीडशे रुपयांप्रमाणे अडीच लाख लाभार्थ्यांना सहा महिन्यांची रक्कम मिळणार आहे. यासाठी 23 कोटी 168 लाखांचा निधी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका कांबळे-आयरे यांनी दिली.
अहमदपूर तालुक्यात पात्र शिधापत्रिकांची संख्या 5 हजार 848 असून 28 हजार 185 लाभार्थी संख्या आहे. आतापर्यंत 2 हजार 522 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी 11 लाख 34 हजार 900 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. औसा तालुक्यात 9 हजार 325 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 42 हजार 544 लाभार्थी संख्या आहे. 932 लाभार्थ्यांना 4 लाख 19 हजार 400 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. चाकूर तालुक्यात 5 हजार 385 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 25 हजार 545 लाभार्थी संख्या आहे. 3 हजार 977 लाभार्थ्यांना 17 लाख 89 हजार 650 इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे.
देवणी तालुक्यात 2 हजार 685 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 12 हजार 659 लाभार्थी संख्या आहे. 962 लाभार्थ्यांना वाटप 4 लाख 32 हजार 900 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. जळकोट तालुक्यात 1 हजार 730 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 7 हजार 110 लाभार्थी संख्या आहे. 545 लाभार्थ्यांना 2 लाख 45 हजार 250 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. लातूर तालुक्यात 6 हजार 331 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 28 हजार 802 लाभार्थी संख्या आहे. आतापर्यंत 3 हजार 348 लाभार्थ्यांना 15 लाख 6 हजार 600 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. निलंगा तालुक्यात 10 हजार 743 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 53 हजार 547 लाभार्थी संख्या आहे. 2 हजार 181 लाभार्थ्यांना 9 लाख 81 हजार 300 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. रेणापूर तालुक्यात 5 हजार 556 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून25 हजार 214 लाभार्थी संख्या आहे. 1 हजार 20 लाभार्थ्यांना 4 लाख 59 हजार इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यात 2 हजार 917 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 13 हजार 220 लाभार्थी संख्या आहे. 1 हजार 970 लाभार्थ्यांना 8 लाख 86 हजार 500 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. उदगीर तालुक्यात 2 हजार 543 शिधापत्रिकाधारकांची संख्या असून 11 हजार 844 लाभार्थी संख्या आहे. 341 लाभार्थ्यांना 1 लाख 53 हजार 450 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.
लातूर जिल्ह्यात एकूण 53 हजार 63 पात्र शिधापत्रिकाधारका असून 2 लाख 48 हजार 670 लाभार्थी संख्या आहे. आतापर्यंत 17 हजार 798 लाभार्थ्यांना 80 लाख 8 हजार 950 इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.
*****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button