चाकूर तालुक्यात BRS चे जाळे, उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वात गावोगावी पक्षप्रवेश
महावार्ता न्यूज( सुशिल रंगनाथ वाघमारे)
वाघ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात बीआरएसकडे वाढला कल.

चाकूर तालुक्यातील मौजे कलकोटी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीचे अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून (बीआरएस) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कलकोटीचे देवस्थान श्री बालाजी मंदीरात पुजा करुन संपूर्ण गावभर वाजत गाजत रँली काढण्यात आली.या रँलीत गावातील युवक,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम श्री बाबू महाराज बेडेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री उत्तमराव वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कलकोटी येथील कार्यकर्त्यांना उत्तमराव वाघ यांनी बीआरएस पक्षात प्रवेश दिला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उत्तमराव वाघ यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,तरुण महिलांविषयीचे घेतलेले हिताचे निर्णय आम्ही तालुक्यात गावोगाव फिरुन त्यांच्या योजना लोकांपर्यत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम सुरु केले आहे.भविष्यात येथील भागातील शेतकऱ्यांचा बीआरएसकडे अधिकचा कल आहे.
भविष्यात अहमदपूर विधानसभेत परिवर्तन अटळ असल्याचे यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला तुकारामजी जाधव,अंकुश बोमदरे,पञकार माधव वाघ,नवनाथ डिगोळे,सरपंच परमेश्वर कांबळे,उपसरपंच बापूसाहेब पाटील,माजी तंटामुक्ती अध्यक्ष माधव बडेवार,माजी सरपंच सुधाकर कोपले,माजी सरपंच नारायण कांबळे,राजू कांबळे,माजी उपसरपंच राम चवरे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्या सह इतर कार्यकर्त्यांनी बीआरएस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी गंगाधर अप्पा वाडकर,घणश्याम हाके,नारायण कांबळे,नारायण कोपले,अकाश तिकटे,तेजस करले,एकनाथ जहागिरदार,माऊली कारले,गोविंद कोपले,सचिन हेमनर,शशिकांत मद्रासे,माधव हेमनर,व्यंकट हाके,लहु हाके,हणमंत चवरे,रितेश दिंडे,ज्ञानोबा कांबळे,माधव बडेवार,विठ्ठल कारले,दासू महाराज शेळके,गोरोबा चुलचुलकर,वसंत थावरे,कोंडीबा खडके,भिमा तिकटे,मुरली तिकटे,दत्तू तिकटे,संतोष काळे,शंकर काळे,विकास काळे,शेषराव कांबळे,पंढरी तिकटे,पद्माकर बडेवार,धिरज कांबळे,बापूराव कुढेवाड,विठ्ठल मास्तर, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.