सिने अभिनेत्री मीरा सारंग ने निरर्थक खर्च टाळून अनाथाश्रमातील बालकांसोबत केला साजरा
सामाजिक भान राखून वाढदिवस साजरा करणारी अभिनेत्री

पुणे प्रतिनिधी :- (महावार्ता न्यूज प्रतिनीधी सागर पवार) सिने अभिनेत्री मीरा सारंग यांनी इतर खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस दिघी येथील ज्ञानदीप अनाथाश्रमात 15 डिसेंबर रोजी. मीरा सारंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करुन दिघी शहरातील ज्ञानदीप अनाथाश्रमात त्यांनी अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले.
अनेक लोक वाढदिवसाला हजारो रुपये खर्च करून पैशाची उधळपट्टी करतात. मात्र, सिने अभिनेत्री मीरा सारंग यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपला वाढदिवस अनाथ आणि दिव्यांगांसोबत साजरा केला. यावेळी मीरा सारंग यांचे मित्र परिवार यामध्ये उपस्थित होते.
मीरा सारंग म्हणाले की, मला नेहमीच, आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले असुन गोरगरीब जनतेला व शेतकऱ्यांचे, कलाक्षेत्रातील कलाकार नक्की मी मार्गदर्शन करेल या साठी मी ज्ञानदीप अनाथाश्रम संस्थेचे संचालक रोहन शेट्टी व निखील लिमये हे चांगले काम अनेक वर्ष करत आहे त्यांचेही आभार मानले..