भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात विद्यापीठाच्या हिवाळी परिक्षा सुरुळीत.
संपादक सुशिल वाघमारे

चाकूर:महावार्ता न्यूज प्रतिनिधी :- येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या हिवाळी नोव्हेबर – डिसेंबर २०२३ च्या विद्यापीठीय परिक्षा दि २९ नोव्हेंबर पासुन सुरु झाल्या आहेत . या परिक्षा केंद्रावर जवळ पास ४१० विद्यार्थी कला व वाणिज्य शाखेचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्गातील व एम. कॉम. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी परिक्षा देत आहेत .
या परिक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्र प्रमुख डॉ . शेषराव धोंडगे यांच्या मार्गदर्शना खाली सह केंद्र प्रमुख शिवनेरी महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ . पांडूरंग मुठ्ठे, सहाय्यक केंद्र प्रमुख डॉ राजेश तगडपल्लेवार , प्रा. डॉ . बी .एस . लासूरे , शिक्षकेत्तर कर्मचारी पाडूळे आकाश , सेवक कोकरे बी .एस , स्वामी एस.एस. हे परिक्षा विभागात काम करीत असून या परिक्षा विद्यापीठाने घालुन दिलेल्या नियमा नुसार सुरु असून परिक्षा केंद्र कॉपी मुक्त चालविण्यासाठी प्राचार्य डॉ शेषेराव धोंडगे यांनी अंतर्गत दक्षता पथकाची नेमणूक केली आहे . त्यामुळे परिक्षा सुरुळीत व कॉपी मुक्त सुरु असल्याचे केंद्र प्रमुख डॉ शेषेराव धोंडगे ,सह केंद्र प्रमुख डॉ पांडूरंग मुठ्ठे यांनी सांगीतले .
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातुन प्रकाशित करून सहकार्य करावे