वंचितांच्या दारी थेट प्रशासनच, आता यांना मिळणार शासकिय योजनांचा लाभ.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा स्तुत्य उपक्रम.
चाकूर प्रतिनिधी – लातूररोड येथील संत गोविंदबाबा मंदिर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील वंचित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी तसेच दाखल्यांचे वाटप करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी हे होते तसेच तहसीलदार नरसिंग जाधव व गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांची उपस्थिती होती
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते 16 कुटुंबांना शिधापत्रिकांचे वाटप,19 लाभार्थ्यांना जातीचे दाखले,17 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड, 23 लाभार्थ्यांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले.
87 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, 54 लाभार्थ्यांचे नवीन आधार कार्ड काढणे – आधार कार्ड दुरुस्तीची कामे करण्यात आली, 19 नागरिकांचे नवीन बँक खाते काढण्यात आले तर 8 पात्र लाभार्थी यांचे श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी नायब तहसीलदार दिगंबर स्वामी,मंडळ अधिकारी अभिजीत बेलगावकर, नागोराव गायकवाड, अव्वल कारकून अनिल कचरे, गुरुदत्त सुरवसे, गणेश विडेगोट्टी, बालाजी इंगळे, तलाठी बी यू पाटील, अविनाश पवार, प्रशांत तेरकर, बालाजी हाके, महसूल सहाय्यक संजय कासराळीकर, शशिकांत वाघमारे, लातूर रोड ग्रामपंचायतचे सरपंच घनश्याम मस्के,
बालाजी मुकुटमोरे ,वडवळ ना. चे वैद्यकीय अधिकारी डॉ नागनाथ नागरगोजे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ महादेव सोनवणे,एएनएम श्रीमती सुषमा बोधगिरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अंजली बगडे,जीएनएम फरहाना शेख,एसबीआय बँकेचे सचिन खोत,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक एस आर पवार, कर्मचारी महेश उतकर, विशाल केंद्रे आदीनी पुढाकार घेतला.