चिमुकल्यांनी अभिनयातून जिंकली श्रोत्यांची मने..
देशभक्तीपर गितासह अनेक गीतावर थिरकली चिमुकले.

चाकूर महावार्ता न्यूज: मॉडर्न इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेज ,नागेशवाडीया शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन ‘मॉडर्न फेस्टिवल-२०२४’ शुक्रवारी (दि. १६ फेब रोजी ) शाळेमध्ये उत्साहात साजरा केला गेला.स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष नागेशवाडीचे सरपंच मा.सुनील केसाळे हे होते .विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील आपल्या बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. या स्नेहसंमेलनाचे निमित्ताने गुणवंत विद्यार्थी,खेळामध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.अशाप्रकारे व्यवस्थापकीय कर्मचारी, विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ यशस्विरीत्या पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात अनिता आणि रोहीनेकर प्रतिभा यांनी केले.
आभार मुख्याध्यपक कुलकर्णी ए बी यांनी केले.पालकांनी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे तसेच संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल नागेशवाडी व रोहिना अंबिका ग्रामपंचातवतीने शाळेच्या या उपक्रमाबाद्दल पारितोषिक देण्यात आले ,त्याबद्दल संस्थ्येचे अध्यक्ष नरहरी पुजारी व संस्थ्येचे सचिव प्रमोद मुळजकर यांनी आभार मांडले .