राज्यस्तर सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत माहिराला सुवर्णपदक.
आरोहीला रजत तर आयान आणि आदित्यला कास्य पदक प्राप्त.

लातूर महावार्ता न्यूज दि २१ जानेवारी ३३ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील माहिरा इसरार सगरे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर आरोही मंचक राऊतराव हिने रजत तर आदित्य शर्मा व आयान असिफ पठाण यांना कास्य पदक प्राप्त झाले आहे. पुणे जिल्हातील फायटर्स तायक्वांदो ॲकडमी आयोजित उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंञी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून शिव छञपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दि १८ ते २० जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच तायक्वांदो खेळात लातूर जिल्हाची हि सर्वाधिक कमाई असुन तायक्वांदो खेळाकडे खेळाडुंचा कल वाढत असताना दिसत आहे.
सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा या ११ वर्षाखालील वयोगटात पार पडल्या. सुवर्ण पदक विजेती माहिरा इसरार सगरे हि राजा नारायनलाल लाहोटी शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी आहे तर ति आपली खेळातील चुणुक पहिल्याच स्पर्धेत दाखवली आहे. ति भविष्यात ऑलिम्पिक खेळाडु होण्याचे संकेत आत्ताच दिले असुन तिने या स्पर्धेत सर्वच फेऱ्या सर्वाधिक गुणांच्या फरकाने पार केल्या असल्याचे तिचे आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी सांगितले आहे.
या स्पर्धेतील रजत पदक विजेती आरोही राऊतराव हि केशवराज विद्यालयात शिकत असुन तिचेही उत्कृष्ट प्रदर्शन होते. कास्य पदकाचे मानकरी ठरलेले आदित्य शर्मा व आयान खान हे बंकटलाल लाहोटी शाळेतील खेळाडु आहेत.
लातूर जिल्ह्यातील क्रीडा विभाग तायक्वांदो खेळासाठी सहकार्य करत नसुन ऑलिम्पिक दर्जाच्या या खेळाला महाराष्ट्र शासनाचे व जिल्हा क्रीडा परिषदेचे कोणतेच सहकार्य लाभत नाही लातूर क्रीडा विभागातील जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना अनेकवेळा पञ व्यवहार करुनही तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रास जागा उपलब्ध करुन दिली जात नाही. राज्याचे क्रीडा मंञी संजय बनसोडे तत्कालीन पालकमंञी अमित देशमुख यांच्या पञाला क्रीडा अधिकारी लकडे यांनी केराची टोपली दाखवली आहे. विजेत्या खेळाडुंचा साधा सत्कारही केला जात नाही. तायक्वांदो खेळाडुंना त्यांच्या हक्काचे प्रशिक्षण केंद्र असणे खुप गरजेचे असल्याचे आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय तायक्वांदो पंच नेताजी जाधव यांनी सांगितले आहे.
या राज्य स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचे मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेशजी लाहोटी बंकटलाल लाहोटी शाळेचे मुख्याध्यापक प्रधांत बुक्कावार उप मुख्याध्यापक वैभव पोतदार, राजा नारायणलाल लाहोटी शाळेचे रजिस्ट्रार प्रविण शिवणगिकर केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी क्रीडा शिक्षक प्रयागराज गरुड, सुनिल मुनाळे, गणेश इगवे, जहांगीर शेख, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, आशोक घारगे, पोलीस उप निरीक्षक अनिल कांबळे, अमर केंद्रे यांच्यासह तायक्वांदो जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.