पुरनमल लाहोटी वस्तीगृहाच्या जेवणात आळ्या ,विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये – अभाविप

लातूर (महावार्ता न्यूज) दि १३ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगराच्या वतीने पुरमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातील उपहारगृहामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून जेवणामध्ये अळ्या व कीडे निघत आहेत या विषयाला घेऊन निवेदन देण्यात आले.
उजी
मागील बऱ्याच दिवसांपासून वस्तीगृहातील जेवणात अळ्या आढळून येत होत्या विद्यार्थ्यांनी वारंवार महाविद्यालयाकडे तक्रार करून देखील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळच्या जेवणामध्ये देखील आळ्या आढळून आल्या यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभाविपशी संपर्क साधला. यावेळी अभाविप लातूर महानगरमंत्री सुशांत एकोर्गे यांनी अशी मागणी केली की “बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या जेवण्यामध्ये आळ्या निघत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होवू शकते विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोक्यात होवू शकतो विषयाची गांभीर्यता लक्षात घेता महाविद्यालयाने उपहारगृह चालकावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळू नये.जर यापुढे असा प्रकार आपल्या उहारगृहात आढळला तर विद्यार्थी परिषदेच्या रोषास सामोरे जावे लागेल. तात्काळ अभाविपच्या मागणीची दखल घेत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपहारगृह चालकाकडून यापुढे असा प्रकार घडणार नाही असे लेखी आश्वासन त्यांनी घेतले.
यावेळी महानगरमंत्री सुशांत एकोर्गे, सहमंत्री नरेंद ठाकूर,पंकज रामावात,प्रणव कोळी,आदित्य गायकवाड,राम जाधव,अक्षय स्वामी व इतर महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.