खरी कमाईतून विद्यार्थ्यानी केली काही तासात हजारो रुपयांची उलाढाल
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त उपक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

चाकूर (महावार्ता न्यूज प्रतिनीधी) चापोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आनंदनगरी या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी स्वामी विवेकानंद प्रा. माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते.गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमांचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष बाबुराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी अँड.हाक्के , मुख्याध्यापक व्यंकटेश बाबुराव शिंदे, मुख्याध्यापक माधव होनराव हे होते.
इयत्ता पहिले ते दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेत प्रथम,दि्वतीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या मरेवाड प्रतिक्षा,स्वामी अभिषेक,शितल सोमवंशी (वर्ग 10वा) कुंटे अस्मिता,तुडमे श्रद्धा,स्वामी स्नेहल( वर्ग 9वा) अनुष्का बोंबडे,काळे अर्पिता (वर्ग 8वा) स्वामी नव्या, महेश माळी,बालाजी चेपुरे, अनन्या डोंगरे,कोमल गडदे (वर्ग 7वा) देशमुख अरहन, योगेश गोरे, राजेंद्र भंडारे वर्ग (6वा),सुडे वेणु,सुडे वृंदा, श्रद्धा गडदए (वर्ग 5 वा ) शेख सैफ, स्वामी सिध्दी (वर्ग 4था),हाक्के राजनंदिनी,बोंबडे समीक्षा (वर्ग 3रा), बोंबडे स्वरा,तुबा देशमुख ( वर्ग 2रा),शंकरे श्र्लोक, अनुष्का होनराव ( वर्ग 1ला) या विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दुपार सत्रात स्काऊट व गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने खरी कमाई आनंदनगरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आनंदनगरी या कार्यक्रमांचे उद्घाटन मीराताई मधुकर मद्रेवार ग्रामपंचायत सदस्य चापोली यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई नरसिंगराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक व्यंकटेश बाबुराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यात विद्यालयातील मुला- मुलींनी एकुण 26 विविध प्रकारची दुकाने थाटली होती.
यात श्रीकृष्ण पाणीपुरी,काळे बंधु बालुशाही व पेटीस,निलंगा राईस,जय मल्हार रसवंती गृह,यारी मठ्ठा मसाला या दुकानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले .यामध्ये 7000 ते 8000 रुपयाची उलाढाल झाली.
सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये या कार्यक्रमाचा आनंद घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.