खा. सुधाकरराव श्रृगारे यांनी शिरुर ता. येथील थेट मतदारांसी साधला संवाद.

महावार्ता न्यूज अहमदपूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी शिरुर ताजबंद येथील थेट मतदारांच्या गाठी भेटी घेऊन थेट संवाद साधून मतदान रुपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.
देश सुरक्षीत व अबादित ठेवून सर्व घटकांचा सर्वागीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी येत्या 7 में रोजी होणाऱ्या निवडणूकीत कमळ चिन्हासमोरील बटण दाबून तुमची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी अशी भावनिक साद शिरुर ताजबंद येथील मतदारांना घातली. मतदारांनी सुद्धा खा. सुधाकरराव श्रृगारे यांना मोठा प्रतिसाद देत आमचे मत मोदींनाच आहे असे सांगितले.
शिरुर ताजबंद येथे आगमन होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करून जाज्वल्य असलेल्या महादेवाचे दर्शन घेऊन थेट मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला
महेश नागरी पतसंस्थेच्या वतीने खासदार सुधाकरराव श्रृगारे यांच्या सह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत भाऊ चामे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवण कुमार मद्देवाड, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे, अॅड.टी.एन.कांबळे,बालाजी सारोळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे,भाजपा शहराध्यक्ष सुशांत गुणिले, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश बिलापट्टे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष बबलू पठाण,गणेश कापसे, बालाजी पडोळे ,सरपंच मच्छिंद्र वाघमारे,उपसरपंच सुरज पाटील,शिवराज पाटील,जिवण गायकवाड,
अमृत सारोळे,ज्ञानोबा मंतलवाड, बळी मोरे,विठ्ठल सारोळे,प्रा.माधव सरवदे, आनंद गुंडरे,परमेश्वर आढाव, किशन काळे,धर्मपाल सरवदे, रमेश कौरवार, मच्छिंद्र कांडणगिरे, रवी स्वामी,पंढरी चेबळे,रावसाहेब सुर्यवंशी,रमेश मुसने,तुकाराम कलमे, शिवा गायकवाड यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.