माजी विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण, उत्तमराव वाघ यांची शाळेला भेट
चाकूर: (महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे)

शहरातील इंदिरानगर केंद्रीय जिल्हा परिषद शाळा येथे आज दि.१३/०८/२३ रोजी चाकुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार यांच्या हस्ते ध्वजावरून करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक बिराजदार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हुशेन उर्फ पप्पू शेख माजी मुख्याध्यापक सोनटक्के , मुख्याध्यापक मानखेडे पी ए. वाल्मीक पंदे अशोक बने ,आबासाहेब शिंदे प्रदीप शेटे वागलगावे एस.बी. वट्टमवार एस.बी. पुजारी जे.पी., चंद्रकला वाघमारे,कांता जानकर , ज्ञानेश्वर जानकर सजंय स्वामी गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.अरविंद बिराजदार यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगता व्यक्त करताना म्हणाले की मी या शाळेचा विद्यार्थी आहे.आज मला या शाळेचा ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळाला याबद्दल मनाला खूप आनंद वाटतो आहे.देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष पुर्ण झाले आहेत.आपण आझादी का अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम उत्साहाने साजरा करीत आहोत.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच शाळेला राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ यांनी भेट दिली. प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून सामाजिक दायित्व मनात येवून विद्यार्थ्यांना स्वखरचातून मदत करण्याचे आश्वानही दिले. यावेळी माधव वाघ सह मान्यवर उपस्थित होते