
चाकुर (महावार्ता न्यूज) शिवा संघटनेच्या वतीने मंगळवारी लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण यासाठी मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुकाभर प्राबोधन सभा घेण्यास येत आहेत यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आटोला येथिल बैठकीत मिळालेला उत्तम प्रतिसाद.
हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्या जातीस ओबीसी आरक्षण द्यावे. भक्ती स्थळ अहमदपूर येथील विकासासाठी २५ कोटी विशेष निधी द्यावा. मन्मथ शिवलिंग पालखी मार्गांचा विकास करावा.
कपिल धारा विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या विकासकामांना गती द्यावी मंगळवेढा येथील ६३ एकर जागेवर मंजूर करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची त्वरित सुरू करावी अशा प्रमुख ५ मागण्यांसाठी गंजगोलाई ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या ३० आक्टोबर आंदोलनाच्या पुर्वतयारी साठी आटोळा येथे बैठक झाली या बैठकीला शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे यांनी यांनी आरक्षणावर सविस्तर मार्गदर्शन केले व स्वस्थ बसलेल्या गाफील समाजाच्या अडचणी ओरडल्याशिवाय शासन दखल घेत नाही असं परखड मत मांडले.
या वेळी उदगीर कर्मचारी तालुका अध्यक्ष रामेश्वर कदम सरपंच, महेश वत्ते माधवराव धुमाळे सोमनाथ तोडकरी यांच्या सह गावातील बरीच मंडळी उपस्थित होती ३० आक्टोबर रोजी लातूर जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या मोर्चा साठी आटोळा येथील तरूणानी प्रत्येक घरातुन एक मोटारसायकल काढावी व वयस्कर व्यक्ती साठी चार चाकी गाड्यांची सोय करून शेकडो च्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवा व्यापारी आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष, अंतेश्वरजी तोडकरी यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.