या सहभागी व्हा,प्रश्न मांडा, आपल्या प्रश्नांची उकल करा – भोजने
महावार्ता न्यूज:संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज: चाकूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था.पतसंस्था नव्हे तर एक 552 सदस्यांचा एकत्रित परिवार.
आपण सारे सहभागी होऊ या आपल्या समस्या आपले प्रश्न मांडू या
चाकुर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची वर विशेष सर्वसाधारण सभा येत्या रविवारी चाकुर येथे सकाळी ठीक 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
पतसंस्थेचे सन्माननीय सदस्य या नात्याने आपण या विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे ही विनंती आहे.
नूतन संचालक मंडळाच्या काळातील ही पहिलीच सभा असुन पूर्ण संचालक मंडळ आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. आम्ही सर्वजण आपल्या आगमनाची वाट पाहत आहोत. त्यामुळे आपण रविवारचा एक दिवस पत संस्थेसाठी राखीव ठेवावा हेच आपल्याकडे मागणे आहे.
खरे तर ही कर्ज वाटणारी एक संस्था नसून जिल्हा सरचिटणीस शिक्षक सहकारी पतसंस्था हे एक मोठे कुटुंब आहे. या परिवारातील सदस्यांचा आनंद हा संचालक मंडळाचा आनंद आहे. परिवारातील सदस्यांचे दुःख हे आमचेच दुःख आहे असे मानणारी आम्ही माणसे आहोत. पतसंस्थेचा हा परिवार जास्तीत जास्त आनंदी कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. आपल्या संकटकाळी अवघे संचालक मंडळ आपल्या पाठीशी आहे असाही शब्द आपणास देत आहे.
पतसंस्थेच्या विकासात या संस्थेचा सदस्य असणाऱ्या महिला भगिनींचा खुप मोठा वाटा आहे. त्यांनीही या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती आहे.
बरेच शिक्षक अजूनही या पतसंस्थेचे सभासद झाले नाहीत. त्यांनीही लवकरात लवकर या संस्थेचे सभासदत्व स्वीकारावे ही विनंती.
चला तर मग आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी, गुणवंतांचा गौरव करण्यासाठी, प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त झालेल्या मान्यवरांना निरोप देण्यासाठी आपण सारेजण या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊ या!असे आवाहन उपाध्यक्ष चंद्रकांत भोजने यांच्या वतिने करण्यात आले आहे